Narayan Rane response to Shankaracharya on Pahalgam terrorist attack saam tv
Video

Narayan Rane: शंकराचार्यांना तो अधिकार नाही, त्या विधानावर नारायण राणेंचा पलटवार|VIDEO

Narayan Rane response to Shankaracharya: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे यांनी जगद्गुरु शंकराचार्य ज्योतिष्पीठाधीश्वर स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

Omkar Sonawane

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यावर जगद्गुरु शंकराचार्य ज्योतिष्पीठाधीश्वर स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, सर्वात मोठी अडचण ही आहे की जेव्हा आपल्या घरात जर काही घटना घडली तर आपण सर्वात अगोदर कोणाला पकडणार? सर्वात आधी चौकीदाराला पकडू, त्याला विचारू तू कुठे होता? ही घटना घडली कशी? पण येथे तर असे काहीच घडत नाहीये. अशी घणाघाती टीका शंकराचार्यांनी केली.

पुढे ते म्हणाले, चौकीदारांविषयी कुठेच काही चर्चा होत नाहीये. ते बोलत आहे की, ते पाकिस्तानला धडा शिकवतील. पण दहशतवादी पाकिस्तानमधून आले होते की नाही, हे इतक्या लवकर कसे माहीत झाले? हे तुम्हाला हल्ला घडण्यापूर्वी का नाही समजले? जर दहशतवादी पाकिस्तानातून आले असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे असे शंकराचार्य म्हणाले.

यावरच भाजपचे खासदार नारायण राणे यांनी शंकराचार्यांवर पलटवार केला आहे. मी आदर करतो शंकराचार्यांचा ते आमचे धर्मगुरू आहे. देशातील प्रमुखांनी जर देशाच्या सौरक्षणासाठी कोणता निर्णय घेतला तर त्यावर कोणीही भाष्य करू नये देशहिताच्या निर्णयावर बोलू नये तो तुमचा अधिकार नाही असे प्रत्युत्तर नारायणे राणे यांनी शंकराचार्यांना दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, बोगद्यामध्ये ७-८ वाहनांची एकमेकांना जोरदार धडक

Saiyaara Vs Ye re ye re paisa 3: 'सैयारा'मुळे मराठी चित्रपटाला शोच मिळेना; मनसे नेत्यानं दिला कडक इशारा

Politics : चिराग भडकले, नितीश कुमार सरकारवर तुटून पडले; निवडणुकीआधीच बिहारचं राजकारण तापलं

Heart Attack Tips : सतर्क राहा! हार्ट अटॅक आल्यावर घरात एकटे असताना काय करावं, हे जाणून घ्या

Maharashtra Live News Update: बीडमध्ये वाल्मीक कराडचे बॅनर, बॅनर लावणारे अजित पवारांच्या जवळचे

SCROLL FOR NEXT