Nandurbar Police and Tribal Awareness Team Rescue Sarpanch Dilip Pawra After Film-Style Abduction in Dhadgaon Saam Tv
Video

नंदुरबारचा बीड होतोय? सरपंचाचं फिल्मी स्टाईल अपहरण अन्..., नेमकं काय घडलं? VIDEO

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील सावऱ्यादिगर गावातून आदिवासी सरपंच दिलीप पावरा यांचं फिल्मी स्टाईल अपहरण करण्यात आले.

Omkar Sonawane

नंदुरबार जिल्ह्यातील नर्मदा नदीच्या काठावर वसलेल्या धडगाव तालुक्यातील दुर्गम सावऱ्यादिगर गावातून एका आदिवासी सरपंचाचं फिल्मी स्टाईलने अपहरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऊसतोड ठेकेदारांनी आपले अडकलेले पैसे काढण्यासाठी थेट सरपंचालाच लक्ष्य केलं. सरपंच दिलीप पावरा यांचे हातपाय बांधून त्यांना तब्बल आठशे किलोमीटर दूर नेत एका गोठ्यात डांबून ठेवण्यात आलं होतं. मात्र, धडगाव पोलीस आणि आदिवासी जनजागृती टीमच्या सतर्कतेमुळे अवघ्या २४ तासांत त्यांची सुखरूप सुटका करण्यात यश आलं असून, या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्येसारखा हा कट होता का? असा सवाल आता उपस्थित होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारत टॉप 3 एआय (AI) राष्ट्रांमध्ये असावा, इंडिया एआय मिशनवर पीएम मोदींचा भर

Maharashtra Live News Update: बाळ विक्री प्रकरणातील डॉक्टर बाजपेयीचा अटकपूर्व जामीन न्यायालयानं फेटाळला

भाजप कार्यालयाबाहेर ‘टिपू सुलतान झिंदाबाद’च्या घोषणा अन्...;

शेवटची इच्छा अपूर्णच राहिली; भरधाव वाहनाने चिरडून वडिलांचा मृत्यू,भीषण अपघातामुळे बापलेकींची ताटातूट

Pune Crime: बायकोच्या छळाला कंटाळला, इमारतीवरून उडी मारत नवऱ्याची आत्महत्या; पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT