Tragedy Strikes in Soygaon Saam tv
Video

Chhatrapati Sambhajinagar News: दोन भाऊ नदीवर बैल धुण्यासाठी गेले, तिथेच अनर्थ घडला अन्...; पोटच्या मुलांच्या जाण्यानं कुटुंबावर पसरली शोककळा|VIDEO

Devastation in Nandgaon: बैल धुण्यासाठी पाण्यात उतरलेल्या तीन जणांपैकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

Omkar Sonawane

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील नांदगाव येथे शुक्रवारी एक धक्कादायक घटना घडली आहे. बैल धुण्यासाठी तलावात उतरलेल्या तिघांपैकी दोन चुलत भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला, तर एकाला 17 वर्षीय तरुणीने वाचविले.

मृत्यू झालेल्यांची नावे अखिल पठाण आणि अहियान पठाण अशी असून त्यांची मृतदेह शवविच्छेदनासाठी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी तीन तरुण बैल धुण्यासाठी गावातील तलावात उतरले होते. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अखिल आणि अहियान यांचा बुडून मृत्यू झाला आणि तिसऱ्या तरुणाला तिथे असलेल्या एका 17 वर्षीय तरुणीने पाण्यात उतरून त्याचा जीव वाचवला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण नांदगावात शोककळा पसरली आहे. याबाबतचा पोलीस अधिकचा तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : दहा वर्षे केंद्रात कृषीमंत्री, सहकारासाठी योगदान काय? विखे पाटलांची नाव न घेता शरद पवारांवर टीका

Nag Panchami 2025 : नाग पंचमीच्या तारखेपासून ते पूजेची पद्धत सर्व माहिती घ्या जाणून

Maharashtra Live News Update: युरिया टंचाईमुळे शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Beed Shocking : तरुण डॉक्टरची इंजेक्शन घेऊन आत्महत्या; बीडमध्ये खळबळ

Nashik Honey Trap : नाशिक हनी ट्रॅप प्रकरणाची व्याप्ती वाढली; ७२ वरिष्ठ अधिकाऱ्यांसह डॉक्टर्स, व्यावसायिक अडकले

SCROLL FOR NEXT