Nanded SAAM TV
Video

Nanded : नांदेडमध्ये ग्रामसभेत तुफान राडा, गावकऱ्यांनी एकमेकांना तुडवलं; चौघे जखमी | पाहा VIDEO

Gram Panchayat Elections : नांदेडच्या कंधार तालुक्यातील हाळदा गावात ग्रामसभेत दोन गटात राडा झाला.या राड्यात 4 जण जखमी झाले आहेत. गावकऱ्यांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करित असताना वाद आणखीन चिघळला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील हाळदा गावात ग्रामसभा सुरू असताना दोन गट एकमेकांत भिडले आणि पाहता पाहता चांगलीच हाणामारी देखील झाली. ग्रामसभेत झालेल्या या गोंधळात दोन्ही गटांमध्ये चांगलीच मारामारी झाली असून, चार जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. काही सुज्ञ गावकऱ्यांनी दोन्ही गटाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही गट ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.ग्रामपंचायतीच्या निवडणुका आता जवळ आल्याने गावागावात वादविवाद वाढले असून त्यातून हाणामारी होण्यापर्यंत प्रकार वाढले आहेत. तसेच हाळदा इथल्या या हाणामारीच्या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राधाकृष्ण विखे पाटील यांची मोठी प्रतिक्रिया|VIDEO

कोणत्या भाजीच्या फोडणीमध्ये मिरचीच्या पेस्टचा वापर करू नये?

Maharashtra Live News Update: ठेकेदाराच्या फायद्यासाठी नागरिकांना किडलेले धान्य? वखार महामंडळावर भ्रष्टाचाराचा आरोप

Golden Data : बोगस लाभार्थीची खैर नाही! नागरिकांचा 'गोल्डन डेटा' तयार; सरकार काय कारवाई करणार?

कामावर गेला, परत आलाच नाही, विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू; निधनाचे वृत्त कळताच आईने...

SCROLL FOR NEXT