Heavy police presence at the disputed cremation site between Manur and Sangam villages in Nanded. Saam Tv
Video

Nanded News: स्मशानभूमीच्या वादावरून दोन गावचे गावकरी भिडले, अंत्ययात्राच थांबवली|VIDEO

Police Deployed In Nanded Due To Funeral Land: नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील मनुर आणि संगम या दोन गावांमध्ये स्मशानभूमीच्या जागेवरून तणाव निर्माण झाला आहे. अंत्यविधीच्या वेळी दोन्ही गावचे लोक भिडले.

Omkar Sonawane

नांदेड: येथील स्मशानभूमीच्या जागेवरून दोन गावात प्रचंड वाद झाला. नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील मनुर आणि संगम या दोन गावात हा वाद झाला. मनुर गावात स्मशानभूमीसाठी जागा नसल्याने जवळच असलेल्या संगम या गावात स्मशानभूमीसाठी जागा निश्चित करण्यात आल्याची माहिती महसूल विभागाने दिली आहे. परंतु ही जागा मनुरच्या गावकऱ्यांना स्मशानभूमीसाठी संगम गावचे गावकरी देण्यास तयार नाहीत.

आज मनुर येथील एका व्यक्तीचे निधन झाले. त्या व्यक्तीचे अंत्यविधी करण्यासाठी मनुरचे गावकरी संगमच्या गायरान जमीन इकडे अंत्यविधी करण्यास जात असताना संगम गावच्या गावकऱ्यांनी तीव्र विरोध केला.

यावेळी दोन्ही गावचे गावकरी आपापसात भिडले. मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी मागवण्यात आला. पोलीस बंदोबस्तात संगमच्या गायरान जमिनीवर अंत्यविधी पार पडला.परंतु महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच पोलीस अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने वाद मिटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.दरम्यान संगम या गावचे गावकरी संगम येथील गायरान जागा देण्यास तयार नाहीत. त्यामुळे अजून देखील या ठिकाणी प्रचंड तणाव असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lata Pharande : महिला सरपंचाने केला मोठा घोटाळा, प्रशासनाकडून मोठी कारवाई, साताऱ्यात राजकीय वर्तुळात खळबळ

Gold Rate Today: आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याची चमक हरपली; बाजारभावात मोठी पडझड, जाणून घ्या 24k, 22k, 18k सोन्याचे दर

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी कोण पात्र? ₹१५०० बंद का झाले? वाचा सविस्तर

हॉटेलसारखा पुलाव घरी होत नाही? फक्त १ चमचा वापरा 'हा' घरगुती मसाला; चव होईल दुप्पट

Maharashtra News Live Update: पेणमधील 35 हजार गणेशमूर्ती परदेशी रवाना

SCROLL FOR NEXT