Ashok Kharat Saam Tv
Video

मंत्रिमंडळातील ४ बड्या मंत्र्यांचा खरात प्रकरणात सहभाग, नाना पटोलेंच्या दाव्याने राजकारणात खळबळ

Ashok Kharat latest news : भोंदू अशोक खरात प्रकरणात राज्य सरकारमधील चार बड्या मंत्र्यांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे.

Namdeo Kumbhar

Nana Patole press conference : नाशिकचा भोंदू अशोक खरात याच्या अटकेनंतर काँग्रेस नेते नाना पटोलेंनी राज्य सरकारवर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. या प्रकरणात सरकारमधील चार बड्या मंत्र्यांचा सहभाग असल्याचा दावा केला आहे. नाना पटोले यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

ज्याप्रमाणे एपस्टीनचा मृत्यू झाला, त्याचप्रमाणे अशोक खरातलाही माहिती बाहेर येऊ नये म्हणून मारले जाईल, अशी भीती नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा तपास केल्यास सरकारमधील चार मंत्री यात अडकतील, असेही ते म्हणाले. लवकरच या मंत्र्यांची नावे पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना कळवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दोषी आढळणाऱ्या चारही मंत्र्यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT