MNS workers protest outside Yes Bank, Nagpur after alleged unfair JCB seizure; chaos unfolds as manager attacked. Saam Tv
Video

Nagpur News: येस बँकेत मोठा राडा; मनसे कार्यकर्त्यांनी मॅनेजरच्या कानशीलात लगावली, काळं फासलं पाहा, VIDEO

MNS Protest Over JCB Loan Seizure: नागपूरच्या येस बँकेकडून एकतर्फी जेसीबी जप्ती व विक्री प्रकरणावरून मनसेने आज बँक शाखेसमोर जोरदार आंदोलन केलं. संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी मॅनेजरच्या कानशिलात लगावून काळं फासलं.

Omkar Sonawane

  • नागपूर येथील येस बँकेच्या माउंट रोड शाखेसमोर मनसेचे तीव्र आंदोलन

  • इंद्रजित मुळे यांची जेसीबी बँकेकडून एकतर्फी जप्त आणि विक्री

  • चर्चेला न आल्याने संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी मॅनेजरला मारहाण करत काळं फासलं

  • बँकेच्या अन्यायकारक कारभारावर संताप व्यक्त करत घोषणाबाजी

नागपूर : येथील येस बँकेकडून एकतर्फी कारवाई करत कर्जदाराची जेसीबी जप्त करून विक्री केल्याच्या प्रकारावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज माउंट रोडवरील येस बँक शाखेसमोर तीव्र आंदोलन छेडलं. इंद्रजित बळीराम मुळे यांनी येस बँकेकडून जेसीबीसाठी कर्ज घेतले होते. मात्र काही हप्ते थकित राहिल्याने, त्यांनी आरटीओमध्ये जेसीबी पासिंगसाठी नेले असताना बँकेने अचानक ती जप्त केली आणि परस्पर विक्री केली. या एकतर्फी आणि अन्यायकारक निर्णयाविरोधात मुळे यांनी मनसेकडे धाव घेतली होती. मनसे पदाधिकारी बँकेसमोर निदर्शन करत असताना, त्यांना गेटवरच रोखण्यात आलं. त्यामुळे शाखेसमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी बँकेचे कर्मचारी चर्चेसाठी समोर न आल्यामुळे आंदोलन अधिक चिघळले.

बँकेचे कर्मचारी चोर आहेत, म्हणूनच ते समोर यायला घाबरत आहेत. आम्ही शांततेत चर्चा करू इच्छित होतो, पण त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली, असा संतप्त आरोप मनसे पदाधिकाऱ्यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PAK vs BAN: बांगलादेश आऊट; फायनलमध्ये रंगणार भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार

Unrest in Ladakh: लेह-लडाखमध्ये दहशत; भाजप कार्यालय जाळले, Gen-Z आंदोलन का उफाळलं?

MHADA Diwali Bonus: म्हाडा कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर! खात्यात किती जमा होणार पैसा?

EPFO सदस्यांसाठी खूशखबर, आता ATMमधून काढा पीफचे पैसे

Maharashtra Politics: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात रश्मी ठाकरे अॅक्टिव्ह नवरात्रीचं कारण की निवडणुकीची रणनीती?

SCROLL FOR NEXT