Fahim Khan’s Illegal Property Demolished Saam Tv
Video

Fahim Khan: मोठी कारवाई! फहीम खानच्या घरावर बुलडोझर, पोलिस बंदोबस्तात तोडकाम सुरू

Fahim Khan’s Illegal Property Demolished: नागपूर हिंसाचारातील मुख्य आरोपी फहीम खानविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. नागपूरमधील फहीम खानच्या घरावर बुलडोझर चढवण्यात आला आहे.

Priya More

नागपूर दंगलीचा मास्टर माईंड फहीम खानविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. फहीम खानच्या घरावर महानगर पालिकेकडून बुलडोझर चालवण्यात आला. सकाळी १० वाजता मनपाने तोड काम कारवाईला सुरूवात केली. फहीम खानचे नागपूरच्या टेकानाका परिसरात घर असून या घराचा काही भाग अतिक्रमण करून वाढवण्यात आला होता. या अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्यात आली आहे. नागपूर महानगर पालिकेने या अनधिकृत अतिक्रमणाविरोधात फहीम खानच्या कुटुंबीयांना नोटीस बजावली होती. त्यानंतर पालिकेकडून या तोडकाम मोहिमेला सुरूवात करण्यात आली.

मनपा कारवाईच्या पार्श्वभूमीवर यशोधरानगर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. स्थानिक पोलिस, एसआरपीएफच्या दोन तुकड्या परिसरात तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच इतर पोलिस स्टेशनकडून मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. फहीम खानच्या घरासमोरच टीनाचे शेड तोडण्यात आले आहे. तसेच वॉल कंपाऊंड सुद्धा तोडण्यात आले आहे. विद्युत पुरवठा खंडित करून दोन जेसीबी आणि एक पोकलँडच्या सहाय्याने फहीम खानचे घर पाडण्यात येत आहे. ही कारवाई बरेच तास चालणार आहे. या कारवाईमुळे आजूबाजूचे सर्वच रस्ते बंद करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dalimb vs Sitaphal: डाळिंब की सीताफळ? आरोग्यासाठी कोणते फळ अधिक फायदेशी, जाणून घ्या ७ फरक

Maharashtra News Live Update: जरांगे पाटलांच्या आंदोलनावर शंभूराज देसाईंचे स्पष्टीकरण; म्हणाले, “त्यांना अर्धसत्य माहिती मिळतेय”

Salt Intake : पुरुषांनी आणि महिलांनी दिवसाला किती मीठ खावे? जाणून घ्या योग्य प्रमाण

Pink Sauce Pasta Recipe: रेस्टॉरंटस्टाईल क्रीमी आणि चटपटीत 'पिंक सॉस पास्ता' घरीच बनवा; वाचा रेसिपी

Disha Salian Death Case: मोठी बातमी! दिशा सालियन प्रकरणात ६ वर्षांनंतर गुन्हा दाखल, मृत्यूमागचं रहस्य उलगडणार

SCROLL FOR NEXT