Nagpur Rain News Saam TV
Video

Nagpur : नागपूरात मुसळधार पावसाचा अंदाज, ऑरेंज अलर्ट जारी | VIDEO

Nagpur Orange Alert : नागपूरला मुसळधार पावसानं झोडपले आहे. त्यामुळे शहरातील अनेक सखल भागात आणि रस्त्यांवर पाणी साचले आहे.पुढील २४ तासात नागपूरच्या विदर्भात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नागपूर शहरात काल संध्याकाळपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक भागांत पाणी साचल्याने नागपूरकरांची मोठी तारांबळ उडाली आहे.नागपूरात मुसळधार पावसामुळे ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शहरातील सखल भाग, मुख्य रस्ते आणि उपनगरांमध्ये पाणी साचून वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाली आहे. मुसळधार पावसामुळे शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.सिटीत ठिकठिकाणी जलजमाव झाल्याने वाहनचालकांना अडथळ्यांना सामोरे जावं लागलं. तसेच, काही भागांत घरांमध्येही पाणी घुसल्याच्या घटना घडल्या आहेत.

अचानक आलेल्या या मुसळधार पावसामुळे बाजारपेठा ओस पडल्या आणि नागरिक घरातच अडकून पडलेआहेत. हवामान विभागानं पुढील २४ तासांसाठी नागपूरसह विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.नागपूरमध्ये पावसाने दिलेली ही जोरदार हजेरी पुढील काही दिवस तरी असाच कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT