NAFED and NCCF onion procurement scam surfaces again as Sam TV report exposes poor quality stock and discrepancies in storage records. Saam Tv
Video

NAFED Onion Scam: नाफेड आणि NCCF च्या कांदा खरेदीत पुन्हा घोटाळा; साम टीव्हीच्या हाती अहवाल|VIDEO

NAFED NCCF Onion Procurement Scam In Nashik: नाफेड आणि एनसीसीएफच्या कांदा खरेदी प्रक्रियेत पुन्हा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे.

Omkar Sonawane

  • नाफेड आणि एनसीसीएफच्या कांदा खरेदीत पुन्हा घोटाळा उघड

  • कागदोपत्री खरेदी व प्रत्यक्ष साठ्यात मोठी तफावत

  • निकृष्ट दर्जाचा, अती ओलसर आणि काळसर पडत चाललेला कांदा

  • वेंकटेश्वर व गणेश ज्योती एफपीसीएल केंद्रांवर अनियमितता आढळल्या

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही

नाफेड आणि नॅशनल को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन (NCCF) यांच्या कांदा खरेदी प्रक्रियेत पुन्हा एकदा मोठा घोटाळा उघड झाला आहे. कागदोपत्री दाखवलेली कांदा खरेदी आणि प्रत्यक्ष साठवलेला कांदा यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचे आढळले आहे.

साम टीव्हीच्या हाती आलेल्या अहवालानुसार, खरेदी केलेला कांदा कमी गुणवत्तेचा असून त्याला काजळी लागलेली आहे. अती जास्त ओलसरपणा असलेला आणि काळसर पडत चाललेला हा कांदा साठवणीस ठेवण्यात आला आहे. सिन्नर तालुक्यातील वेंकटेश्वर एफपीसीएल आणि गणेश ज्योती एफपीसीएल या कांदा खरेदी व साठवणूक केंद्रांवर मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि गैरप्रकार आढळले. वेंकटेश्वर एफपीसीएल केंद्रावर रजिस्टरमध्ये ३६५४ मेट्रिक टन कांदा साठवलेल्याची नोंद आहे; मात्र प्रत्यक्षात साठा यापेक्षा लक्षणीय कमी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या सर्व प्रकारामुळे नाफेड आणि NCCF यांच्या कांदा खरेदी व साठवणीतील पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 : मुंबईमध्ये विसर्जनावेळी दुर्घटना, मिरवणुकीदरम्यान विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये मजुरांना घेऊन जाणारे वाहन पलटी, १२ जण जखमी

Earthquake : अमरावतीमध्ये भूकंपाचे लागोपाठ २ धक्के, घरांतील भांडी पडली, नाल्याला भेगा

Nanded : गणरायाच्या विसर्जनासाठी उतरले नदीत; पाय घसरल्याने तिघेजण गेले वाहून, एकाला वाचवण्यात यश

Viral Video: बापरे...जीवघेणा स्टंट! तरुणाने चक्क पाण्यात जाऊन मासे नाही तर मगरीला पकडले, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT