MVA On Rahul Gandhi's Statement SaamTv
Video

Rahul Gandhi News : अखेर मविआचे नेते राहुल गांधींच्या वक्तव्यावर बोलले

MVA On Rahul Gandhi's Statement : राहुल गांधी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना एक कार्यक्रमात त्यांनी भारतातील आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. त्यामुळे भाजपकडून सध्या देशभरात राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन देखील करण्यात येत आहे.

Saam Tv

राहुल गांधी यांच्या आरक्षणावरच्या वक्तव्यावरून भाजप आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून राहुल गांधींची पाठराखण करण्यात येत आहे. राहुल गांधी यांनी 50 टक्केची मर्यादा नको, असं सांगितल्याचं प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हंटल आहे. तर संजय राऊत यांनी देखील, ' विरोधकांकडून तोडून फोडून वक्तव्य जनतेसमोर आणल्याचं म्हंटल आहे.

राहुल गांधी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना एक कार्यक्रमात त्यांनी भारतातील आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. यात त्यांनी देशातील आरक्षण काढून टाकावं असं म्हंटल असल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यामुळे भाजपकडून सध्या देशभरात राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन देखील करण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राहुल गांधी यांच्या वक्तव्याची पाठराखण केली जात असल्याच दिसून आलं आहे. नाना पटोले यांनी यावर बोलताना, ''आपल्या देशात अजून ही समानता आली नाही, त्यामुळे आरक्षण संपायचं कारण नाही. 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेली पाहिजे.'' ही भूमिका राहुल गांधींनी मांडल्याचं म्हंटल आहे. तर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील, राहुल गांधी जे बोलले ते वक्तव्य विरोधक तोडून फोडून चुकीच्या पद्धतीने जनतेसमोर आणत असल्याचं म्हंटल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Silver Gift : सोने की चांदी? आवडत्या व्यक्तीला काय देणं शुभ ठरेल?

Monsoon Health Care: पावसाळ्यात रात्री झोपल्यावर कानात घोण शिरला तर? घाबरु नका 'या' ७ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

IMD Weather Update: १३ राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात शुक्रवारी कसं असेल हवामान, पाहा अपडेट

Maharashtra News Live Update: खेडमध्ये अतिवृष्टीचा हाहाकार; तिघांचा मृत्यू, एक जण बेपत्ता

Khopoli Hill Station : पावसाळी पिकनिकसाठी परफेक्ट! खोपोलीपासून हाकेच्या अंतरावर वसलंय स्वर्गाहून सुंदर हिल स्टेशन

SCROLL FOR NEXT