MVA Seat Distribution News SaamTV
Video

VIDEO : मविआत 38 जागांवर मैत्रीपूर्ण लढत? मोठी अपडेट आली समोर !

MVA News Update : दोन दिवसांच्या बैठकीनंतर महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा सुटलेला बघायला मिळत आहे. 250 जागांवर आघाडीतील तिन्ही पक्षांचं एकमत झालं असून 38 जागांवर मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Saam Tv

आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत 38 जागांवर मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे. जवळपास 250 जागांवर मविआमध्ये एकमत झालं आहे. यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत गेल्या दोन दिवसांपासून बैठक सुरू आहे. मंगळवारी देखील एक बैठक सर्व नेत्यांमध्ये झाली आहे. त्यानंतर आता कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

विधानसभा निवडणुकांचं बीगुल थोड्याच दिवसांत वाजणार आहे. त्यानंतर आता सगळ्यापक्षांकडून तयारी केली जात असताना जागावाटपावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांकडून देखील जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी अनेक दिवसांपासून पक्षांतर्गत बैठका, खालबतं सुरू असल्याचं दिसलं आहे. आता मविआमध्ये 250 जागांवर एकमत झालं असल्याचं सांगण्यात येत आहे. तर 38 जागांवर मैत्रीपूर्ण लढत दिली जाईल असं देखील सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. त्यानंतर आता उमेदवारी कोणाकोणाला दिली जाईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मुंबईमध्ये जोरदार राडा, भाजप कार्यकर्त्यांना बेदम मारहाण, डोक्यावर भयंकर वार, व्हिडिओ व्हायरल

Bihar Bhawan: मुंबईत तयार होणार बिहार भवन, ३० मजली इमारतीसाठी ३१४ कोटींचा खर्च; फायदा नेमका कुणाला होणार?

Maharashtra Live News Update: चांदीचा भाव प्रति किलो 3 लाख 4 हजार रुपये; ग्राहकांच्या खिशाला फटका

High Cholesterol Symptoms: सावधान! थंडीत ही 5 लक्षणे अजिबात दुर्लक्षित करु नका, असू शकतो उच्च कोलेस्ट्रॉलचा धोका

Pune Satara Highway: पुणे सातारा प्रवास सुसाट होणार! ४५ मिनिटे वाचणार; सरकारचा मास्टरप्लान

SCROLL FOR NEXT