आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी महाविकास आघाडीकडून ब्लुप्रिंट तयार करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. विभागनिहाय जागा देण्यावर वरिष्ठांचा भर असणार आहे.
विधानसभा निवडणुकांचं बीगुल लवकरच वाजणार आहे. त्यासाठी आता जागावाटपाचं सूत्र प्रत्येक पक्षाकडून ठरवलं जात आहे. महाविकास आघाडीकडून जागावाटपासाठी ब्लुप्रिंट ठरवण्यात आली असल्याचं सूत्रांनी सांगितल आहे. यात विभागनिहाय जागा वाटपाप्रमाणे कॉंग्रेसला मराठवाडा आणि विदर्भातील जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पक्षाचा होल्ड लक्षात घेता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील जागा सुटणार असल्याचं बोललं जात आहे. तर ठाकरे गटाला कोकण आणि मुंबईतील जागा मिळतील अशीही शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता नेमकं जागा वाटप कसं होणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.