Aditya Thackarey SaamTV
Video

वरळीत आदित्य ठाकरेंचा प्रचार, माध्यमांना दिली प्रतिक्रिया; पाहा Video

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सगळ्याच उमेदवारांकडून प्रचार सभा आणि मतदारांच्या गाठीभेटी घेण्याचा जोर वाढला आहे. आज वरळी विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि मविआचे वरळीचे उमेदवार आदित्य ठाकरे यांनी देखील मतदारसंघात फिरून आपला प्रचार केला आहे.

Saam Tv

मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघाचे मविआ शिवसेना उबाठाचे उमेदवार आदित्य ठाकरे यांनी आज आपला प्रचार करत नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. वरळीमध्ये आम्ही केलेलं काम बोलेल. वरळीतील जनता यांच्या पाठीशी आहे. असं त्यांनी यावेळी बोलताना म्हंटलं आहे. पंतप्रधान मोदींच्या एक है तो सेफ है या नाऱ्यावर देखील यावेळी त्यांनी टीका केली, आमच्याकडून एअर बसचा प्लान घेऊन गेले आणि तिकडे वडोद्यात तोच प्लान वापरुन त्याचा रोड शो मोदींनी यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी काढला का? असा सवाल देखील यावेळी त्यांनी उपस्थित केला.

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी गाजत असून आता प्रचार सभा, रॅली आणि गाठीभेटींना जोर आला आहे. आज वरळी विधानसभा मतदारसंघाचे मविआचे उमेदवार आदित्य ठाकरे यांनी मतदारसंघातील नागरिकांच्या भेटी घेत, त्यांच्याशी संवाद साधला आहे. वरळीत आम्ही काम केलं आहे, विकास केला आहे. इथली जनता आम्हाला साथ देईल असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

युद्धात अडकलेल्या गाझामध्ये वाळूचे वादळ; नागरिकांचे हाल, VIDEO

Pune Crime: वाघोलीनंतर आता सिंहगडमध्ये कोयता हल्ला; कोयत्यानं सपासप वार करत १९ वर्षीय तरुणाचा घेतला जीव

भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण कंत्राटात मोठा भ्रष्टाचार? KDMC महापौरांकडून चौकशीचे आदेश

आता सरकारचा इंटरनेट टॅक्स? मोबाईल इंटरनेटही महागणार?

Rajya Sabha Election: काँग्रेसच्या ३ आमदारांवर होणार कारवाई; राजकीय वर्तुळात खळबळ, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT