Western Railway Delayed Saam TV
Video

Western Railway Delay : माहिम ते बांद्रा दरम्यान तांत्रिक बिघाड, पश्चिम रेल्वे वाहतूक विस्कळीत|VIDEO

Mumbai Western Line Train Delay : गर्दीच्या वेळेत गाड्या थांबून राहिल्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले आहे.पश्चिम रेल्वे मार्गावरील सर्वच रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीये. माहिम ते बांद्रा रेल्वे स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाला .ऐन गर्दीच्या वेळी पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. माहीम रेल्वे स्थानकाजवळील पॉईंट बिघडल्यामुळे फास्ट ट्रॅकवरील लोकल सेवेवर परिणाम झालेला पाहायला मिळतोय. एकापाठोपाठ एक लोकलच्या रांगा लागल्या आहेत. सध्या पश्चिम रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने सुरू आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावरील सर्वच रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर एकाच ठिकाणी बराच वेळ लोकल थांबून राहिल्याने प्रवाशांची दमछाक झाली. या विलंबामुळे ऑफिसला जाणाऱ्या मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. यामुळे त्यांना कामावर लेटमार्क लागण्याची शक्यता आहे. तर शाळेत आणि कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे देखील हाल झाले. प्रवाशांना मनस्ताप तर झालाच मात्र प्रचंड गर्दीतून प्रवास करावा लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर ॲन्जिओप्लास्टी

Success Story: शिक्षणासाठी घरापासून ९ वर्षे लांब, सलग ४ वेळा अपयश, पाचव्या प्रयत्नात UPSC क्रॅक; सिक्युरिटी गार्डचा मुलगा होणार सरकारी अधिकारी

Sugarcane Juice: उन्हाळ्यात उसाचा रस प्यायल्याने मिळतील हे ७ जबरदस्त फायदे

दैवी शक्तीच्या नावाने खरातची काळी कृत्ये, नराधम महिलांना कसा ओढायचा जाळ्यात? वाचा अत्याचाराची मोडस ऑपरेंडी

Weight Loss Tips: नाचणी की ज्वारीची भाकरी? पोटाचा घेर कमी करण्यासाठी कोणता पर्याय ठरतो फायदेशीर

SCROLL FOR NEXT