Shruti Vilas Kadam
उसाचा रस नैसर्गिक साखरेने भरलेला असल्यामुळे तो लगेच ऊर्जा देतो आणि थकवा दूर करतो.
उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता होते. उसाचा रस शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत करतो.
उसाचा सर नैसर्गिकरित्या थंडावा देणारा असल्यामुळे उष्णतेपासून आराम मिळतो.
उसाचा रस यकृत (लिव्हर) स्वच्छ ठेवण्यास मदत करतो आणि पिवळ्या कावीळीतही उपयुक्त मानला जातो.
यात असलेले पोषक घटक पचनक्रिया सुधारतात आणि अॅसिडिटी कमी करतात.
अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचा निरोगी राहते आणि चमक वाढते.
व्हिटॅमिन्स आणि मिनरल्समुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.