Passengers wait inside a halted underground metro train at CSMT station after a technical malfunction in Mumbai. Saam Tv
Video

मुंबईकरांचा खोळंबा! भुयारी मेट्रो कोलमडली; सीएसएमटी स्थानकावर प्रवाशांचे हाल|VIDEO

Mumbai Underground Metro Service Disruption: मुंबईतील भुयारी मेट्रो सेवेत अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने सीएसएमटी स्थानकावर प्रवाशांचे मोठे हाल झाले. दरवाजे बंद न झाल्यामुळे मेट्रो सेवा काही काळ थांबवण्यात आली.

Omkar Sonawane

मुंबई : मुंबईतील भुयारी मेट्रो सेवा अचानक खोळंबल्याची घटना समोर आली आहे. कफ परेडच्या दिशेने जाणाऱ्या मेट्रोचे दरवाजे बंद न झाल्यामुळे मेट्रो सेवा थांबवण्यात आली. ही घटना सीएसएमटी स्थानकावर घडल्याची प्राथमिक माहिती आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कफ परेडला जाणारी मेट्रो स्थानकावर उभी असताना प्रवाशी मेट्रोत बसले होते. मात्र, मेट्रोचे दरवाजे सतत उघड-बंद होत असल्याने तांत्रिक बिघाड झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरवाजे बंद न झाल्यामुळे मेट्रो जागीच थांबवण्यात आली.

या अचानक झालेल्या बिघाडामुळे मेट्रोतील प्रवाशांना बराच वेळ ताटकळत बसावे लागले. परिणामी, प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांना उशीराचा सामना करावा लागला. दरम्यान, तांत्रिक पथकाकडून बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरू असल्याची माहिती असून, मेट्रो सेवा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Plane Crash : खासगी विमानाचा भयंकर अपघात, दिग्गज खेळाडूसह अख्ख्या कुटुंबाचा मृत्यू, कशी घडली दुर्घटना?

Accident : पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्ह! दारुच्या नशेत कारचालकाने डिलिव्हरी बॉयला उडवले, छातीवरून चाक गेले अन्...

Maharashtra Live News Update: मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी

Anurag Dwivedi Case: लॅम्बोर्गिनी ते थार...; युट्यूबरच्या घरी ईडीचा छापा, दुबईतील क्रूझवर लग्न केल्याने संशय वाढला

Green Chutney Potato Slices : हिरव्या चटणीचे झणझणीत आणि कुरकुरीत बटाट्याचे काप, एकदा करुनच बघा

SCROLL FOR NEXT