Mumbai Rain Saam Tv
Video

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पाऊस, अंधेरी सब-वे पाण्याखाली; पाहा VIDEO

Mumbai Rain Video: मुंबईमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. अंधेरी सब-वे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे अंधेरी सब-वे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

Priya More

मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरात मागील अर्धा तासापासून जोरदार पाऊस सुरू आहे. या जोरदार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेला आहे. अंधेरी सबवे सखल भाग असल्यामुळे तिथे दोन ते तीन फुटापर्यंत पाणी भरले आहे. त्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अंधेरी पोलिस आणि वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून अंधेरी सबवेबाहेर बॅरिकेट लावून बंद करण्यात आला आहे. अंधेरी सबवे बंद झाल्यामुळे अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक पोलिसांकडून अंधेरी सबवे बंद असल्यामुळे वाहन चालक गोखले पुलाचा वापर करावी असा सूचना दिला जात आहे. तर मुंबईत इतर ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mobile Recharge Under 200: फक्त 199 रुपयांत 28 दिवसांची वैधता; Jio, Airtel, Vi चा जबरदस्त रिचार्ज प्लान

एकनाथ शिंदेंचा पाटलांना मोठा धक्का! TDCC निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय, मोठा उलटफेर

सौदी अरबमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश; भीषण अपघातात १४ जणांचा मृत्यू

Pune Rainfall: पुणे जिल्ह्याला पावसाने झोडपलं, ढगफुटीसदृश्य परिस्थिती; जनजीवन विस्कळीत, पाहा VIDEO

Moong Dal Chilla Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा पौष्टिक आणि चविष्ट मूग डाळ चिल्ला, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT