Mumbai Rain Alert SaamTv
Video

Mumbai Rain Update : मुंबईत पावसाची बॅटिंग; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Saam Tv

मुंबईतील पश्चिम उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साठल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. मालाड, कांदिवली, बोरीवलीत पावसाचा जोर अधिक दिसून आला आहे. मुंबईतील पश्चिम उपनगरात शुक्रवारी दुपारनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. गेल्या अर्धातासापासून मालाड, कांदिवली, बोरीवलीत जोरदार पावसाची बॅटिंग सुरू असल्याने सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच काम नसल्यास घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

मुंबईत गेल्या काही तासांपासून तुफान पाऊस सुरु आहे. गेल्या काही तासांत कोसळलेल्या पावसांमुळे नागरिकांची तारंबळ उडाली आहे. जोरदार पावसाने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर रस्त्यावरही प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. तर हवामान विभागाने दुसऱ्या दिवशी देखील पावसाचा इशारा दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local Train : मुंबईकरांचा पुन्हा होणार खोळंबा, आज रेल्वेच्या या मार्गावर ब्लॉक; अनेक लोकल रद्द

Weather Alert : मुंबई, कोकणासह विदर्भातील १८ जिल्ह्यांत आज तुफान पावसाचा इशारा; हवामान खात्याकडून अलर्ट जारी

Numerology : या तारखेला जन्मलेले व्यक्ती असतात धोरणी अन् हुशार; तुमचा भाग्यांक कोणता? जाणून घ्या...

Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य, या राशीच्या व्यक्तींच्या मनातील इच्छा होणार पूर्ण; फक्त कर्म चांगले ठेवा

Horoscope Today : कोणाच्या राशीत आज काय? वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT