Mumbai Pune Expressway traffic update Saam TV marathi
Video

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर गॅस टँकर उलटला, मोठ्या प्रमाणात गॅसगळती, १६ तासांपासून महामार्ग ठप्प, पाहा व्हिडिओ

Mumbai Pune Expressway gas leak : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अडोशी बोगद्याजवळ गॅस टँकर उलटून मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू आहे. १६ तासांपासून महामार्गावरील वाहतूक ठप्प असून NDRF व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Namdeo Kumbhar

Mumbai Pune Expressway traffic update : मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकर उलटल्याने प्रवाशांची कोंडी झाली. मंगळवारी संध्याकाळी गॅस टँकर उलटून अपघात झाला. १६ तास उलटून गेल्यानंतर देखील या गॅसची गळती थांबवण्यात कामी प्रशासनाला यश आलेले नाही. अग्नीशमन दल, बचाव आणि मदत पथक, NDRF च्या टिम घटना स्थळी दाखल झाल्या आहेत. पण केमिकल एक्सपर्ट टिम आली नसल्याने गॅस गळती थांबवण्याच्या कामी विलंब होत आहे. सुरक्षितता पाळून मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वरील वाहतूक वळवण्यात आली आहे.

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील अपघातग्रस्त टँकरमधून होणारी गॅस गळती अद्याप थांबलेली नाही. या प्रकरणी बचाव मदत पथक घटना स्थळी दाखल झाले आहे. प्रवाशांचे होणारे हाल लक्षात घेत वाहतुक पर्यायी मार्गाने वळवण्यात येत आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनाही यावर अपडेट दिली आहे. संध्याकाळी ६ वाजेपासून थांबवलेली वाहतूक अजूनही सुरू झालेली नाही. टँकर हटवण्याचे काम सुरू आहे. मुंबईला जाण्यासाठी पर्यायी रस्त्याचा उपयोग करा, असे आवाहन त्यांनी केलेय. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे अडोशी बोगद्याजवळ गॅस चा टॅंकर उलटून गॅस लिक झाल्याने मुंबईकडे जाणारी सगळी वाहतूक थांबवलेली आहे ज्यामुळे प्रचंड मोठी वाहनांची कोंडी..ट्रॅफीक जाम आहे, असे त्यांनी म्हटलेय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आपापसात भिडले

Green Tea Benefits: वजन कमी, ग्लोईंग स्किन अशा अनेक फायद्यांसाठी दिवसातून एकदा प्या हे खास ड्रिंक

आताची सर्वात मोठी बातमी! आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होणार? शिवसेनेच्या गोटातून महत्त्वाची अपडेट

Back pain causes: सतत होणाऱ्या पाठीच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करताय? या गंभीर समस्येचं आहे लक्षण

Public Holiday: महत्त्वाची बातमी! २३ एप्रिलला सार्वजनिक सुट्टी; या ठिकाणी शाळा, कॉलेज अन् सरकारी कार्यालये राहणार बंद; कारण काय?

SCROLL FOR NEXT