Locals in Mumbai Prabhadevi confronting former corporator Samadhan Saravankar during a heated dispute over proposed shed construction Saam Tv
Video

मुंबईत शिंदे सेनेचे नेते आणि स्थानिकांमध्ये मोठा राडा, हेल्मेट मारलं, कॉलर पकडली अन्...VIDEO

Maharashtra Politics: प्रभादेवीत शेड बांधकामावरून माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार वाद झाला. आपत्कालीन परिस्थितीत अडथळा निर्माण होईल या कारणावरून नागरिकांनी कामाला विरोध केल्याने सरवणकर यांना माघार घ्यावी लागली.

Omkar Sonawane

मुंबईतील प्रभादेवी परिसरात शिंदे गटाचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली आहे. साई सुंदर इमारतीसमोर शाखेसाठी उभारण्यात येणाऱ्या शेडवरून हा वाद निर्माण झाला. आपत्कालीन परिस्थितीत हे शेड अडथळा ठरेल असं म्हणत स्थानिकांनी या कामाला कडाडून विरोध केला. या विरोधानंतर सरवणकर यांना घटनास्थळावरून माघार घ्यावी लागली. माझं वैयक्तिक काम नव्हतं, ते लोकांचं काम होतं. जर लोकांना नको असेल तर आम्ही थांबवू, अशी प्रतिक्रिया समाधान सरवणकर यांनी दिली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, प्रभादेवीत राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरेंच्या मनसेचे २ उमेदवार गायब? राजकीय वर्तुळात खळबळ

कल्याणमध्ये मोठी राजकीय घडामोड; दोन दिग्गज नेत्यांची एकत्र बैठक, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

ऐन निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; बड्या नेत्याचा शिवसेनेला 'जय महाराष्ट्र'

Ladki Bahin eKYC: थर्टी फर्स्टची डेडलाईन तरी ई-केवायसी सुविधा सुरूच; लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक घोळ?

Friday Horoscope : नव्या वर्षाचा पहिला शुक्रवारी ठरेल लकी; जुळणार प्रेमाच्या रेशीम गाठी, ५ राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार

SCROLL FOR NEXT