Siddhi Hande
जेवणासोबत नेहमी तोंडी लावायला काही न काही लागतं. अनेकांना चटणी खूप आवडते.
तुम्ही कधी शेंगदाण्याची चटणी खाल्लीये का? चटणी बनवण्याची पारंपारिक पद्धत नक्की ट्राय करा.
सर्वात आधी तुम्हाला शेंगदाणे तव्यावर खरपूस भाजून घ्यायचे आहे.
यानंतर शेंगदाण्याची साल काढून घ्या. शेंगदाण्याची पूर्ण साल काढू नका.
यानंतर लसूण फोडून घ्यायचा आहे. लसणाची साल काही प्रमाणात तशीच राहू द्या.
यानंतर मिक्सरमध्ये लसूण, मिरच्या आणि शेंगदाणे वाटून घ्या. शेंगदाणे जाडसर राहू द्या.
यानंतर तवा गरम करण्यासाठी ठेवा. त्यावर थोडं तेल टाका. त्यावर ही चटणी टाका.
चटणी मंद गॅसवर खरपूस होईपर्यंत भाजून घ्या. यावर आवश्यकतेनुसार मीठ टाका.
शेंगदाण्याची चटणी तुम्ही जेवताना खाऊ शकतात. चटणीची टेस्ट खूप मस्त लागते.