Mumbai Police News Saam tv
Video

Mumbai Police Transfer : मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्या, कारण काय?

Mumbai Police Transfer update : मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्यात. गेल्या ४ वर्षांपासून ही प्रक्रिया रखडली आहे

Ganesh Kavade

मुंबईतील पोलीस दलातील पीएसआय ते एपीआय दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या गेल्या ४ वर्षांपासून रखडल्या आहेत. मुंबई पोलीस आयुक्तांच्या अतिम मंजुरीअभावी प्रकिया रखडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलीस महासंचालक कार्यालयातून बदल्या मंजूर झाल्यानंतर संबंधित जिल्हा किंवा आयुक्तालयानुसार स्थानिक पातळीवरील बदल्या होतात.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 22N नुसार सर्वसाधारण बदली कालावधी निश्चित करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांची २ वर्षांनी बदली होते. इतर शाखांतील अधिकाऱ्यांची ३ वर्षांनी बदली होते. कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर बदली अपेक्षित असते. मात्र, जवळपास 1000 पेक्षा जास्त अधिकाऱ्यांनी ३ ते ४.५ वर्षे एकाच पोलीस ठाण्यात काम केले असूनही बदल्या नाहीत. मागील वर्षीही पीएसआय ते एपीआय स्तरावरील बदल्या न झाल्याने आता २ वर्षांचा संचय झाल्याचे समोर आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भयंकर! गरोदर महिलेच्या पोटावर लाथ मारली, क्षुल्लक वादामुळे जन्माला येण्यापूर्वीच बाळाचा मृत्यू

Ladki Bahin Yojana : ई-केवायसी करताना चूक झालीय? फक्त २ मिनिटांत करा दुरूस्ती; फॉलो करा ही प्रोसेस

Social Media Ban: भारतातही १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी करावी का? नेटकऱ्यांचं मत काय? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: थार, फॉर्चूनर सारख्या महागडा स्पोर्ट कारवर वाहतूक पोलिसांची कारवाई

Dhurandhar: 'असे चित्रपट कधी कधी...'; धुरंधर चित्रपटाच्या वादावर प्रसिद्ध अभिनेत्याची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT