Mumbai Police SaamTv
Video

VIDEO : ऐन निवडणुकीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर? मुंबईतील १६१ पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या !

Mumbai Police : विधानसभा निवडणुकीच्या काळात मुंबईतील १६१ पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

Saam Tv

मुंबईतील १६१ पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. मुंबईसह नवी मुंबई, मीराभाईंदर, वसई - विरार येथील एकूण २२१ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. दरम्यान, या अचानक केलेल्या बदल्यांमुळे पोलीस निरीक्षकांत नाराजी बघायला मिळत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबईतील १६१ पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. मुंबईसह नवी मुंबई, मीराभाईंदर, वसई - विरार येथील बदली केलेल्या पोलीस निरीक्षकांचा हा आकडा २२१ चा आहे. अनेक संवेदनशील भागात असलेल्या पोलिसांच्या देखील अचानक बदल्या करण्यात आल्या आहेत. सध्या निवडणुकीचा हंगाम सुरू असल्याने या बदल्या केल्यामुळे नवीन पोलीस निरीक्षक यांना प्रक्रिया समजून घेण्यासच निवडणुकीचा काळ देखील संपून जाईल. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे. सलग आठ वर्षापेक्षा अधिक काळ मुंबईत सेवा केलेल्या पोलीस निरीक्षकांच्या निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बदल्या झाल्या असल्याचं बोललं जात आहे. मात्र या बदल्यांमुळे पोलीस निरीक्षकांत नाराजी असल्याने याबाबत दाद मागण्यासाठी पोलीस मॅटमध्ये जाणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Update : राज्यात आजही मुसळधार पावसाची शक्यता, कुठे कोणता अलर्ट? वाचा सविस्तर

अजित पवारांचा शरद पवारांना मोठा धक्का, दौंडचा शिलेदार घड्याळ हातात घेणार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

WhatsApp वर 'Online' दिसणं टाळायचंय? ही सेटिंग बंद करा, फॉलो करा 'हे' टिप्स

Sunday Horoscope Update : चूक केली असेल तर लगेच माफी मागा…; वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT