MNS SAAM TV
Video

Sharad Pawar : विरोधकांचा सत्याचा मोर्चा, ठाकरे बंधूंसह शरद पवार सहभागी होणार | VIDEO

MNS - Shivsena : मुंबईत आज निवडणूक आयोगाविरोधात विरोधकांचा सत्याचा मोर्चा निघणार आहे. या मोर्चात शरद पवारांसह, ठाकरे बंधू, काँग्रेस, भाकप, माकप पक्ष सहभागी होणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबईत आज निवडणूक आयोगाविरोधात विरोधकांचा ‘सत्याचा मोर्चा’ निघणार आहे.त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप वारंवार काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडून करण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा विरोधी पक्षांनी हा मुद्दा लावून धरला होता आणि त्याच संदर्भामध्ये आज महाविकास आघाडी आणि इतर जे महत्त्वाचे घटक पक्ष आहेत त्यांच्याकडून मोर्चा काढला जात आहे.

या मोर्चामध्ये राष्ट्रवादीचे शरद पवार, ठाकरे बंधू, काँग्रेस, भाकप आणि माकप पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. फॅशन स्ट्रीटपासून मोर्चाची सुरुवात होऊन तो आझाद मैदानात येणार आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदान परिसरात ठाकरेंसेना, राष्ट्रवादी आणि मनसेचे झेंडे लावून वातावरणनिर्मिती करण्यात आली आहे.रस्ताच्या चार ही बाजूने मोठमोठे बॅनर लावलेले दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची उपस्थिती अपेक्षित असल्याने पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT