mumbai news Saam tv
Video

पुण्यानंतर मुंबईत खळबळ; CSMT, BMC वर संशयास्पद ड्रोन; नागरिक भयभीत

mumbai news : पुण्यानंतर मुंबईत खळबळ उडाली आहे. मुंबईच्या CSMT, BMC वर संशयास्पद ड्रोन दिसल्याने एकच भीतीचं वातावरण निर्माण झालं.

Vishal Gangurde

पुण्यातील हडपसरमध्ये सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या टॉयलेटमध्ये बॉम्बसदृश वस्तू आढळली. त्यानंतर बीडीएस पथकाची सात तासांची धावपळ उडाली. त्याचवेळी दुसरीकडे मुंबईच्या महानगरपालिका मुख्यालय, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक परिसरात संशयास्पद ड्रोन सदृश्य उडवल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांची परवानगी न घेता ड्रोन उडवला गेल्याची माहिती मिळत आहे. मुंबई महानगरपालिका मुख्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक या अतिसंवेदनशील परिसरात संशयास्पद ड्रोनसदृश्य वस्तू आढळल्याने एकच खळबळ उडाली. सुरक्षिततेच्या दृष्टीने हा परिसर 'नो फ्लाय झोन' घोषित करण्यात आला आहे. त्याच परिसरात ड्रोन दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालंय. परवानगी न घेता ड्रोन उडवणाऱ्यांवर काय कारवाई केली जाते, हे पाहावे लागणार आहे. या ड्रोनविषयी प्रशासनाकडून अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT