Mumbai Monorail  SAAM TV
Video

Monorail Shutdown : मुंबईकरांसाठी मोठी बातमी ! मोनोरेल आजपासून अनिश्चित काळासाठी बंद |VIDEO

Mumbai Monorail : मुंबईतील मोनोरेल सेवा आजपासून अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. सततच्या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता MMRDAने हा निर्णय घेतला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबईतील मोनोरेल सेवा आजपासून अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. सततच्या तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेल ट्रॅकवरच बंद पडत आहेत म्हणूनच MMRDAने हा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांत मोनोरेल दोनदा मध्येच बंद पडल्याचा घटना घडल्या होत्या. ज्यामध्ये अनेक प्रवासी अडकले होते. या दरम्यान, अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.वारंवार होणारे तांत्रिक त्रुटी टाळण्यासाठी आणि मोनोरेल अधिक सुरक्षित, विश्वासार्ह तसेच जलद करण्यासाठी ही सेवा तात्पुरती थांबवण्यात आली आहे. MMRDAने नागरिकांची गैरसोय मान्य करत लवकरच सुधारित आणि दर्जेदार मोनोरेल सेवा पुन्हा सुरु करण्याचे आश्वासन दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

केतनच्या हत्येचं बीड कनेक्शन उघड, केतन हत्या प्रकरणात तिसरा कोण?

आधी लग्न लपवलं, रहस्य उघडकीस आलं अन् प्रेयसीवर पेट्रोल ओतून जिवंत जाळलं, क्रूर कृत्याने संतापाची लाट

MPSC Recruitment: MPSC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, ग्रुप-सीच्या २,६१९ पदांसाठी बंपर भरती; कुठे अन् कसा कराल अर्ज?

Monsoon Health Care: पावसाळ्यात वारंवार पोट बिघडतंय? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय

Rain Alert: मुंबईसह ठाणे-रायगडमध्ये पुढील ३ दिवस मुसळधार पाऊस; पालघर- ठाण्यात उद्या शाळांना सुट्टी

SCROLL FOR NEXT