Mumbai Monorail  SAAM TV
Video

Mumbai Monorail : ट्रायल रनमध्येच मोनोरेलमध्ये बिघाड, MMRDAच्या 'आधुनिक तंत्रज्ञाना'चा बोजवारा | पाहा VIDEO

Monorail Technical Glitch : काही दिवसांपासून मोनोरेल बंद करण्यात आलेली आहे. आधुनिक तंत्रज्ञानासह मोनोरेल ही पुन्हा सुरु होणार असं MMRDA कडून सांगण्यात आले होते. मात्र चाचणी दरम्यानच मोनो पुन्हा बंद पडल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबईतील मोनोरेल पुन्हा एकदा चर्चेत आली असून, वडाळा डेपो जवळ ट्रायल रन दरम्यानच मोनोरेलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची मोठी घटना घडली आहे. वडाला मोनोचे ट्रायल सुरू असताना काही अंतरावर ट्रॅक चेंज करताना मोनोचा मोठा अपघात घडला. यामध्ये मोनो चालक आणि एक इंजिनीयर होते. या घटनेत इंजिनीयरच्या डोक्याला दुखापत झाली असून त्याला जवळच्या रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

'हे महामुंबई मेट्रो प्रशासनाचं फार मोठं अपयश आहे आणि हे प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचं मोठं षडयंत्र आहे,' अशी संतप्त प्रतिक्रिया एका नागरिकाने दिली आहे. पावसाळ्यात दोनदा बंद पडल्यानंतर, एमएमआरडीएने आधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन सिग्नल प्रणालीसह मोनोरेल पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन दिले होते.

मात्र, या आश्वासनानंतरच्या चाचणी दरम्यानच मोनो पुन्हा बंद पडल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चेंबूरच्या दिशेने जात असताना ही घटना घडली असून, एका व्यक्तीला रेस्क्यू करण्यात आल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. या घटनेमुळे मोनोरेलच्या सुरक्षिततेचा आणि एमएमआरडीएच्या नियोजनाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT