उद्धव ठाकरे-राज ठाकरे Saam Tv
Video

Mumbai Mayor Election : मुंबई महापौरपदासाठी ठाकरे फिल्डिंग लावणार, मातोश्रीवर आज महत्त्वाची बैठक

will Uddhav Thackeray contest Mumbai mayor election : मुंबई महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची महत्त्वाची बैठक आज होणार आहे. मनसे, काँग्रेस व एमआयएमच्या संभाव्य पाठिंब्यामुळे मुंबईतील राजकीय गणिते बदलण्याची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

Uddhav Thackeray Shiv Sena update : मुंबई महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीची रंगत आणखी वाढण्याची शक्यता आहे. ठाकरेंची शिवसेना मुंबई महापौर, उपमहापौर पदासाठी निवडणूक लढण्याची तयारी करत आहे. आज ठाकरेंच्या शिवसेनेची महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली आहे. यामध्ये निवडणूक लढवण्यावर चर्चा होणार आहे. उद्धव ठाकरे हे मुंबईतील कार्यकर्ते अन् पदाधिकार्‍यांकडून निवडणुकीबाबत माहिती घेणार आहेत. या बैठकीला माजी महापौर किशोरी पेडणेकर, वरिष्ठ नगरसेवक आणि पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत

उद्धव ठाकरेंची आज पक्षाचे प्रमुख नेते, पालिकेतील गटनेते, वरिष्ठ नगरसेवक यांच्या सोबत बैठक होणार आहे. महापौर, उपमहापौर पदासाठी निवडणूक लढायची की नाही याबाबत निर्णय होणार आहे. निवडणूक लढवायला हवी असं अनेकांचं मत आहे.

सर्व नगरसेवकांना ८ फेब्रुवारी पर्यंत मुंबई बाहेर न जाण्याचे आदेश देण्यात आले आहे. ठाकरे गटाकडे सध्या ६५ नगरसेवक असून, त्यांना मनसे (६ नगरसेवक), काँग्रेस आणि एमआयएम यांची साथ मिळाली तर गणिते बदलू शकतात. शिंदे गटाचे काही नगरसेवक मतदानावेळी गैरहजर राहिले, तर मोठा बदल घडू शकतो, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संगमनेर येथील धक्कादायक घटना, आठ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! महागाई भत्त्याच्या फॉर्म्युलात बदल होणार?

Kharat Case: सर्वात मोठा गौप्यस्फोट! मंत्रिमंडळातील ९ मंत्री खरातचे भक्त, भोंदू बाबाकडून घृणास्पद विधीचा आरोप

High BP Causes: हाय BPचा धोका कोणत्या व्यक्तींना असतो? डॉक्टरांनी सांगितली तुमची चुकीची सवय, आताच व्हा सावध

Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांचं महिला अध्यक्षपद जाणार? खरात प्रकरणावर प्रफुल्ल पटेलांनी स्पष्टच सांगितले

SCROLL FOR NEXT