Harbor Line Services Halted  Saam Tv
Video

Mumbai Local: हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प, लोकल रेल्वे स्थानकावर येताच अचानक धूर निघू लागला अन्...; पाहा VIDEO

Harbor Line Services Halted: हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. खारघर रेल्वे स्थानकावर ओव्हरहेड वायरमध्ये शॉर्टसर्किट होऊन धूर येऊ लागला. प्रवासी प्रचंड घाबरले.

Priya More

हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. नवी मुंबईतील खारघर रेल्वे स्थानकावर ओव्हरहेड वायरमध्ये शॉर्टसर्किट झाला. लोकल रेल्वे स्थानकावर येताच ओव्हर हेड वायरमध्ये शॉर्टसर्किट होऊन धूर येऊ लागला. त्यामुळे या लोकलमध्ये असलेले प्रवासी प्रचंड घाबरले. या घटनेमुळे प्रवाशांची पळापळ झाली.

या घटनेनंतर खबरदारी म्हणून खारघरहून सीएसटी आणि ठाण्याच्या दिशेने जाणारी लोकल वाहतूक थांबवण्यात आली आहे. या घटनेत कोणतीही दुखापत झालेली नाही मात्र अचानक रेल्वे सेवा थांबल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकल वाहतूक ठप्प झाल्यामुळे ठाण्यावरून आणि मुंबईवरून खारघरच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले आहे. रेल्वे प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून दुरूस्तीचे काम सुरू आहे. लोकलसेवा लवकरच पूर्वपदावर येईल, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: - नाशिकच्या पेठ तालुक्यातील सावळघाटात रात्री भीषण अपघात

High blood pressure: औषधांशिवाय BP नियंत्रणात आणायचाय? दररोज फक्त 'या' 3 सवयी लावा

Marathi Serial Off Air : लोकप्रिय मराठी मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, एका वर्षातच गाशा गुंडाळला

Graduates Election : बावनकुळे, पटोले, वडेट्टीवारांसह १४ बड्या आमदारांना मतदानाला बंदी! काय आहे कारण?

Ladki Bahin Yojana : आनंदाची बातमी! लाडक्या बहिणींच्या खात्यावर 'या' दिवशी ३,००० येणार? महत्त्वाचं कारण आले समोर

SCROLL FOR NEXT