Mumbai Rain Saam TV
Video

Mumbai Rain: मुंबईकरांसाठी पुढचे २ दिवस महत्वाचे, हवामान खात्याकडून पावसाचा इशारा

Weather Department: मुंबईसाठी पुढील दोन दिवस महत्वाचे राहणार आहे. मुंबईत पुढील २ दिवस पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर दुसरीकडे मान्सून अंदमानात दाखल झाला आहे.

Priya More

मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. साऊथ वेस्ट मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. मुंबईत पुढील २ दिवस हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये थंडावा असेल असं तज्ज्ञांचं मत आहे. तर विदर्भातील १० जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. याठिकाणच्या नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

हवामान तज्ज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले की, साऊथ-वेस्ट मान्सून अंदमान-निकोबारला १६ मेला दाखल झाला आहे. तो हळूहळू पुढे सरकत आहे. मान्सून मुंबईला येण्यासाठी आणखी वेळ आहे. रायगड आणि ठाण्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊसाची शक्यता आहे. मुंबईत पुढील २ दिवस हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील ११ जिल्ह्यांपैकी १० जिल्ह्यांना पुढील ३ दिवसांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra politics : राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा उभी फूट पडणार? 'एनडीए'चा मोठा प्लॅन

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पेन्शन, प्रमोशन अन् सॅलरीत वाढ होणार, मोठी अपडेट समोर

Maharashtra News Live Update : पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर १५ जूनपासून भाविकांसाठी होणार खुलं

Petrol-Diesel Rate : पेट्रोल-डिझेल भरण्यापूर्वी चेक करा नवीन दर; जाणून घ्या प्रमुख शहरांतील किमती

Heart Failure: हार्ट फेल्युअर म्हणजे नेमकं काय? काय असतात याची सुरुवातीची लक्षणं

SCROLL FOR NEXT