MUMBAI RAILWAY SLUM EVICTION saam tv
Video

रेल्वे ट्रॅकजवळच्या झोपड्या हटवणार; 3500 लोकांना घरे रिकामी करण्याची नोटीस, कुठे होणार कारवाई? VIDEO

Kurla-Trombay Railway Siding Encroachment Row: मुंबईतील कुर्ला-ट्रॉम्बे रेल्वे सायडिंग परिसरातील झोपड्या हटवणार असून मध्य रेल्वेकडून ३५०० रहिवाशांना ३० दिवसांत घरे रिकामी करण्याची नोटीस देण्यात आली आहे.

Omkar Sonawane

मयूर राणे, साम टीव्ही

मुंबईतील कुर्ला-ट्रॉम्बे रेल्वे सायडिंग परिसरातील झोपड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या परिसरातील झोपड्या ३० दिवसांत रिकाम्या करण्याचे आदेश मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. यासंदर्भात रहिवाशांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, ३५०० रहिवाशांवर निष्कासनाच्या कारवाईची टांगती तलवार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १५ ऑक्टोबर रोजी परिसरात नोटिसा लावण्यासोबतच बॅनरही लावण्यात आले आहेत. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, निर्धारित ३० दिवसांच्या मुदतीत जागा रिकामी न केल्यास बळाचा वापर करून रहिवाशांना हटवण्याची कारवाई केली जाऊ शकते. तसेच, संबंधित झोपड्या पाडण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ट्रेनमध्ये प्रवासात मोठ्या आवाजात गाणी ऐकल्यास वसूल करणार दंड, काय आहे नियम?

Home Decor Tips : बेडरुम असो किंवा हॉल घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी कोणत्या पडद्यांची निवड कराल?

'ऑक्टोबर हिट'मध्ये महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ, कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस, पाहा व्हिडिओ

Child Nutrition: मुलांचं पोट भरणं पुरेसं नाही, योग्य पोषणही महत्त्वाचं; डॉक्टरांनी सांगितलं पालकांनी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावं?

Maharashtra News Live Update: नाशिकच्या मालेगाव तालुका परिसरात कोसळल्या पावसाच्या सरी

SCROLL FOR NEXT