Accident Saam
Video

मुंबईत'हिट अँड रन'चा थरार! मध्यरात्री टँकरने डिलिव्हरी बॉयला चिरडले

Mumbai Hit-and-Run Horror: मुंबईतील जोगेश्वरी पश्चिम येथे मध्यरात्री भरधाव टँकरने डिलिव्हरी बॉयला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींनी चालक मद्यधुंद असल्याचा दावा केला असून, पोलिसांकडून हिट अँड रन प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Namdeo Kumbhar

मुंबईतील जोगेश्वरी परिसरात मध्यरात्री 'हिट अँड रन'ची एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना घडली आहे. जोगेश्वरी पश्चिमेकडील अमृत नगर भागात एका भरधाव टँकरने डिलिव्हरी बॉयला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात हर्ष नावाच्या डिलिव्हरी बॉयचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. टँकर चालक पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत असल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.

ही घटना रात्री सुमारे १:२० वाजताच्या सुमारास जोगेश्वरी पश्चिमेतील अमृत नगर येथील अजित ग्लास गार्डन गेटसमोर घडली. हर्ष हा डिलिव्हरी बॉय त्याचे काम करत असताना, भरधाव वेगाने आलेल्या टँकरने त्याला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की हर्षचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political News : भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस, पक्षाच्या कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेत उबाठाच्या आमदाराचे नाव

जमीन खरेदी-विक्रीचा नवा नियम, आता गुंठ्यांत जमीन घेण्यापूर्वी हे वाचाच, अन्यथा व्यवहार ठरेल बेकायदेशीर

Maharashtra News Live Update: अंतरवाली सराटीच्या वेशीवर ओबीसींचे लाक्षणिक उपोषण

Hair care Tips : केस बांधल्यावर चपटे दिसतात? स्ट्रेटनर-कर्लर न वापरता या ७ ट्रिक्स करा फॉलो; केसांना मिळेल क्लासी व्हॉल्यूम

Signs of dehydration: शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास पहिलं लक्षणं काय दिसून येतं?

SCROLL FOR NEXT