Domicil News SaamTv
Video

Mumbai High Court : आता फेरीवाल्यांनाही लागणार डोमिसाईल? पाहा मुंबई हायकोर्ट काय म्हणाले | Video

Domicile Required To Hawkers : राज्यात रस्त्यावर व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी आता फेरीवाल्यांना डोमिसाईल आवश्यक असल्याचा इशारा मुंबई हायकोर्टाने दिला आहे. याबद्दल लवकरच आदेश देण्यात येतील असंही कोर्टाने सांगितलं आहे.

Saam Tv

महाराष्ट्रात जर रस्त्यावर व्यवसाय करायचा असेल तर डोमिसाईल आवश्यक आहे. फेरीवाल्यांसाठी मुंबई हायकोर्टाने आता हा इशारा दिला आहे. या संदर्भात मुंबई हायकोर्ट लवकरच आदेश देणार आहे. इतर राज्यांमध्ये फेरीवाला परवाना पाहिजे असल्यास डोमिसाईल आवश्यक आहे. मग महाराष्ट्रात असं धोरण का नाही? असा खरमरीत सवाल मुंबई हायकोर्टाने उपस्थित केला आहे. या संदर्भातील सुनावणी २४ फेब्रुवारीपर्यंत तहकूब करण्यात आलेली आहे.

शहर फेरीवाला कमिटीच्या निवडणुकीत मतदानासाठी ९९ हजार फेरीवाल्यांना पात्र ठरवण्यासंदर्भात फेरीवाला संघटनेने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. फेरीवाल्यांच्या पात्रतेसाठी असलेल्या निकषात डोमिसाईल अनिवार्य असल्याची देखील अट आहे. असं असतानाही तब्बल ६ हजार डोमिसाईल नसलेल्या फेरीवाल्यांना पालिकेने पात्र ठरवलं आहे. त्यामुळे अन्य फेरीवाले ज्यांच्याकडे डोमेसाईल नाही त्यांनादेखील पालिकेने पात्र ठरवावं अशी मागणी करण्यात आलेली होती. ती मागणी मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे. तसंच महाराष्ट्रात जर रस्त्यावर व्यवसाय करायचा असेल तर डोमिसाईल आवश्यक असून या संदर्भात मुंबई हायकोर्ट लवकरच आदेश देणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिकच्या तपोवन परिसरात दुचाकीस्वाराची हुल्लडबाजी, स्टंट करतानाचा व्हिडीओ व्हायरल

Mobile Battery Low: मोबाईलची बॅटरी अचानक कमी होतेय? तर 'या' ४ सेटींग्स आत्ताच बंद करा

Kurkure Bhel Recipe: चटपटीत कुरकुरे भेळ कशी बनवायची?

Stress Effect: जास्त स्ट्रेसमुळे शरीरात होऊ शकतात हे बदल, वेळीच व्हा सावध

मोठी बातमी! भाजपने भाकरी फिरवली; राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी बड्या नेत्याची नियुक्ती

SCROLL FOR NEXT