CJP च्या मुंबईतील आंदोलनात कार्यकर्त्यांनी “कॉक्रोच माझं नाव, Gyanesh Kumar Must Go” अशा घोषणा देत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. एसआयआर (SIR) प्रक्रिया आणि मतदार यादीतील कथित अनियमिततांवर प्रश्न उपस्थित करत CJP कडून हे आंदोलन करण्यात आलं. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सीजेपी आंदोलनातील गर्दीत अचानक एक दिल्लीचा कॉक्रोच अवतरला. ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा हीच आमची प्रमुख मागणी आहे. त्यांनी जी चूक केलीय, त्याची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या कॉक्रोचने केली आहे. ज्ञानेश कुमार यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे. अशा व्यक्तीला त्या पदावर बसण्याचा अधिकार नाही, असंही हा तरूण म्हणाला. दोन-तीन दिवसांत नक्कीच ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेतील, असेही तो म्हणाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.