Rescue teams conduct search operation near Gilbert Hill after an 8-year-old boy drowned in a water pool in Andheri West. saam tv
Video

मुंबईत हृदयद्रावक घटना! 8 वर्षीय मुलगा पाण्यात बुडाला, शोधमोहीम सुरू|VIDEO

8 Year Old Boy Drowned In Andheri West Forest Water Pool: अंधेरी पश्चिमेतील गिल्बर्ट हिल परिसरात 8 वर्षीय मुलगा पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना. डी.एन. नगर पोलीस आणि अग्निशमन दलाकडून शोधमोहीम सुरू.

Omkar Sonawane

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई: अंधेरी पश्चिम येथील गिल्बर्ट हिल रोडलगतच्या जंगल परिसरात सोमवारी दुपारी एक दुर्दैवी घटना घडली. 8 वर्षीय मुलगा पाण्यात बुडाल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, 3 ते 4 मित्र जंगलातील पाणीसाठ्यात अंघोळ करण्यासाठी गेले होते. त्यावेळी हा मुलगा पाण्यात बुडाला.

घटनेची माहिती मिळताच डी.एन. नगर पोलिस आणि मुंबई अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बेपत्ता मुलाचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू करण्यात आली असून, बचाव पथकाकडून परिसराची कसून तपासणी सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू आहे. पावसाळ्यात जंगल परिसर, नैसर्गिक जलसाठे आणि पाण्याने भरलेल्या धोकादायक ठिकाणी मुलांना जाऊ न देण्याचे आवाहन प्रशासन आणि स्थानिकांकडून करण्यात आले आहे. अधिकृत माहितीची प्रतीक्षा असून शोधमोहीम अद्याप सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसला जोरदार धक्का; बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

CJPचं 'स्कूल ठीक करो' अभियान वादात, लातूरमध्ये दिपकेंसह 5 जणांविरोधात गुन्हा

90 मतदारसंघांत मतदार धोक्यात? 25 टक्के मतदारांची SIR कडे पाठ

पालघरमध्ये विद्यार्थ्यांची जीवघेणी पायपीट, शाळा गाठण्यासाठी मृत्यूच्या ट्रॅकवरुन प्रवास

Face Care: फेस हेअरसाठी तुम्हीपण रेजर वापरताय? चेहऱ्यावर रेजर वापरण्यापूर्वी जाणून घ्या ७ महत्त्वाच्या गोष्टी

SCROLL FOR NEXT