Damaged ST bus after a dumper collision on Muktainagar Malkapur road 7 injured including school students and driver. Saam Tv
Video

ST Bus Accident: ३० विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसला डंपर धडकला | VIDEO

Maharashtra ST Bus Accident: मुक्ताईनगर-मलकापूर दरम्यान भरधाव डंपरने एसटी बसला जोरदार धडक दिल्याने ३० विद्यार्थ्यांसह ७ जण जखमी झाले. बसचालक गंभीर जखमी असून स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Omkar Sonawane

मुक्ताईनगर-मलकापूर दरम्यान मोठा अपघात घडला असून भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने एसटी बसला जोरदार धडक दिली. या अपघातात ३० विद्यार्थ्यांसह एकूण ४५ प्रवासी असलेल्या बसमधील ७ प्रवासी आणि बस चालक जखमी झाले आहेत.

ही दुर्घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली. मुक्ताईनगरहून मलकापूरकडे जाणारी एसटी बस महामार्गावर जात असताना अचानक भरधाव डंपरने समोरून येत जोरात धडक दिली. धडकेमुळे बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले असून बसचालकासह काही प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी पुढे येत जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू केले असून डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, या अपघाताने प्रवासी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून एसटी महामंडळाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : दवाखाने मागे लागतील, विनाकारण पैसे खर्च होतील; ५ राशींच्या लोकांची चिंता वाढणार

Language Controversy : छडी लागे छम छम, मराठी येई घमघम; शंकाराचार्यंसह सगळ्यांना मराठीची मोहिनी

Budh Uday: ऑगस्ट महिन्यात पालटणार 'या' राशींचं नशीब; बुध ग्रह उदित होऊन मिळवून देणार पैसे

Shravan : श्रावणात साप दिसल्यास काय होते? जाणून घ्या त्यामागची धारणा

Dhanishta Nakshatra : धनिष्ठा नक्षत्राचे आरोग्याशी संबंधित दोष कोणते आहेत?

SCROLL FOR NEXT