MPSC paper leak allegations trigger fresh recruitment controversy. Saam
Video

Paper Leak : नीटनंतर राज्यात MPSC चा पेपर फुटला? १०० पैकी ९० प्रश्न फुटल्याचा आरोप, शिक्षण क्षेत्रात खळबळ

MPSC Paper Leak : एमपीएससीच्या औषध निरीक्षक भरती परीक्षेच्या पेपरफुटीचे आरोप समोर आल्यानंतर राज्यात पुन्हा खळबळ उडाली आहे. व्हॉट्सअॅपवर प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याचा आणि गुणांमध्ये विसंगती असल्याचा दावा उमेदवारांनी केला आहे.

Namdeo Kumbhar

MPSC Paper Leak News : MPSC मार्फत घेतलेल्या औषध निरीक्षक भरती परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात आलाय... परीक्षेपूर्वी व्हॉट्सअॅपवर प्रश्न व्हायरल झाल्याचा आणि गुणांमध्ये विसंगती असल्याचा दावा केलाय. याबाबत 2 उमेदवारांनी तक्रार दाखल केलीय... दुसरीकडे, MPSCने पेपरफुटीचे सर्व आरोप फेटाळून लावलेत. या प्रकरणाची पडताळणी केली जाणार आहे. य मात्र तथ्य नसल्यास अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा आयोगाने दिलाय.

२२ मार्च रोजी पार पडलेल्या औषध निरीक्षक भरती परीक्षेपूर्वीच काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाली होती, असा गंभीर आरोप तक्रारदारांनी केला आहे. काही उमेदवारांचे गुण संशयास्पदरीत्या वाढल्याचे समोर आले असून, प्रसिद्ध झालेली गुणपत्रिका आणि अंतिम निवड सूची यामध्ये मोठी विसंगती असल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणातील संबंधित व्हॉट्सअॅप चॅट, कॉल रेकॉर्डिंग आणि इतर डिजिटल पुराव्यांची तात्काळ फॉरेन्सिक तपासणी (Forensic Audit) करण्यात यावी, तसेच संपूर्ण भरती प्रक्रियेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी उमेदवारांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT