Sanjay Raut SaamTv
Video

MP Sanjay Raut News : राऊतांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर ओढले ताशेरे, पाहा Video

Sanjay Raut Statement On Election Commission : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज निवडणूक आयोग आणि भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे.

Saam Tv

अखेर पापाचा घडा भरला आणि निवडणूक आयोगालाच लाज वाटली असेल हे जर फार काळ प्रकरण टिकवलं तर निवडणूक आयोगाची उरलीसुरली इज्जतसुद्धा धुळीस मिळेल म्हणून अखेर देवेंद्र फडणवीस यांच्या लाडक्या ताई यांना राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरून हटवण्यात आलं, अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रश्मी शुक्ला यांच्या बदलीनंतर केली आहे. मंगळवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी महायुती सरकार आणि भाजपवर टीकास्त्र डागलं.

पुढे बोलताना राऊत यांनी, हे सरकार बेकायदेशीर आहे, 'त्यामुळे त्यांनी अनेक नेमणुका बेकायदेशीरपणे करून घेतल्या आहेत. जो अधिकारी तुरुंगात जाण्याच्या तयारीत होता त्या अधिकारावरील गुन्हे सरकार बदलताच काढून त्यांना थेट राज्याच्या पोलिस महासंचालक पदाची जागा देण्यात आली आणि त्यांच्याकडून अनेक गैर्यकृत्य राजकीय करून घेतले' असल्याचं म्हंटलं आहे. 'सत्ताधाऱ्यांच्या पैशांच्या गाड्या आजही सोडल्या जात आहेत. अधिकृत सरकारच्या गाड्यांच्या माध्यमातून पैशांचे वाटप आणि पोहोचवणं सुरू आहे. रस्त्यावर सामान्य नागरिकांना त्रास दिला जात आहे. महिलांच्या पर्स उघडून पाहिले जात आहे आणि निवडणूक आयोगाचे ऑब्जर्वस आलेले आहेत ते मूग घेऊन बसले आहेत, अशी टीका देखील राऊत यांनी केली आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'दम मारो दम' राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता नशा करण्यात दंग, 'तो' व्हिडिओ व्हायरल

Aayush Komkar: क्लासवरून घरी येत होता, बेसमेंटमध्ये दोघांकडून अंदाधुंद गोळीबार; आयुष कोमकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट

Anant Chaturdashi 2025 live updates : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून हेल्पलाइन नंबर जारी

Maharashtra Live News Update: प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानरपालिकेत नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT