फौजदाराचा आता शिपाई झाला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना वैफल्य आलेलं आहे. अडीच वर्ष त्यांनी शिवसेनेतल्या एका गद्दाराला मुख्यमंत्री केलं, अशी टीका उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना केली आहे. फडणवीस यांनी एका गद्दारासाठी त्यांच्याच पक्षाचं अधःपतन केलं आहे, असं म्हणत 2019 मध्ये लागू झालेल्या राष्ट्रपती राजवटी बाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शरद पवार यांच्या पत्राला जबाबदार धरल्याच्या विधानावर संजय राऊत यांनी फडणवीसांवर पलटवार केला.
पुढे बोलताना संजय राऊत यांनी म्हंटलं की, आमच्या पक्षातील गौप्यस्फोट फडणवीस कसं करू शकतात? याबाबतची चर्चा केवळ शरद पवार आणि माझ्यात झाली होती. त्यामुळे फडणवीस यांनी त्यात उगाच नाक खूपसू नये, त्यांना काहीच माहिती नव्हतं, असा प्रतिहल्ला करत देवेंद्र फडणवीस खोटं बोलत असल्याची टीका संजय राऊत यांनी यावेळी केली. शिवसेनेबरोबर 25 वर्ष युती असताना देखील त्यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यास नकार दिला. मुख्यमंत्रीपदावर चर्चा होणार नाही, असं वारंवार सांगितलं जात होतं. मात्र जे ठरलेलं आहे, त्यावर चर्चा व्हायला हवी, असं आमचं म्हणणं होतं. या प्रक्रियेमध्ये मी होतो. त्यामुळे मला सर्व माहिती असल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे.
Edited By Rakhi Rajput
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.