Sanjay Raut Saam Tv
Video

MP Sanjay Raut : जरांगेंच्या विरोधात भुजबळांचा वापर केला; संजय राऊतांचा खोचक टोला|Marathi News

Sanjay Raut Statement On Chhagan Bhujbal : मनोज जरांगे यांच्याविरोधात छगन भुजबळांचा वापरलं झाला, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मंत्रिपद न मिळाल्याने भुजबळ नाराज असल्याने त्यांनी ही टीका केली.

Saam Tv

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल छगन भुजबळ यांनी फार टोकाची भूमिका घेतली होती. मात्र त्यांना ही भूमिका घ्यायला लावली होती असं दिसत आहे. भुजबळ यांचा वापर जरांगे यांच्या विरोधात लढण्यासाठी करण्यात आला असल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला आहे.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, भुजबळ यांच्या मागे त्यावेळी एक अदृश्य शक्ती होती. आता त्याच शक्ती त्यांना वाऱ्यावर सोडलेलं आहे. त्यामुळेच त्यांचा बळी गेला आहे. एक दोन आमदार नाराज झाले तरी या सरकारला तडा जाईल, अशी शक्यता दिसत नाही. त्यामुळे जे आमदार नाराज आहेत ते एक-दोन दिवस लढतील. नंतर त्यांच्या हातात खुळखुळा दिला जाईल आणि ते सर्व आमदार शांत होतील, असा टोलाही यावेळी राऊतांनी लगावला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात जे नमुने आहेत, त्या संदर्भात फडणवीस यांनी अभ्यास करायला हवा, असा सल्ला देत काही दिवसांपूर्वी त्यांच्याच विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांनी काय भूमिका घेतली होती? किती प्रकारच्या भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर केले होते? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला आहे.

एक देश आणि एक निवडणूकसारख्या गोष्टी संघराज्यातील काम करणाऱ्या देशाला किती घातक आहेत, हे भविष्यात कळेल. ज्या गोष्टी संविधानाला मान्य नाहीत, त्या गोष्टी देशावर लादण्याचा प्रयत्न मोदी करत आहेत. मुंबई महानगरपालिकासह राज्यातील 14 महानगरपालिकेच्या निवडणुका तुम्ही घेऊ शकत नाही? याचा अर्थ तुमच्या मनामध्ये पाप आहे. केंद्र सरकारला पूर्णपणे लोकशाही मोडून काढायची आहे. निवडणूक आयोग संपवायचा आहे देशात हुकूमशाही निर्माण करायची असल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT