Mother breaks down in tears as Dharashiv rains flood home with mud : 
Video

Dharashiv Floods: घरात चिखल, मुलांची वह्या-पुस्तके पाण्यात, आईच्या अश्रूचा बांध फुटला, काळजाला धस्स करणारा व्हिडिओ

Dharashiv Rain update : धाराशिवमध्ये मुसळधार पावसामुळे घरात पाणी शिरले असून मुलांची पुस्तके, संसाराचे साहित्य वाहून गेले आहे. महिलांच्या डोळ्यातून अश्रू वाहत असून कुटुंबियांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे.

Namdeo Kumbhar

Mother breaks down in tears as Dharashiv rains flood home with mud : मागील दोन दिवसांपासून धाराशिवमध्ये पावसाने हाहाकार माजवलाय. आभाळ फाटल्यागत पाऊस पडला अन् अनेक संसार उघड्यावर पडले. नदी-नाल्याला पूर आले आहेत, त्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलेय. धाराशिवमधील आंबी गावातील घरात पुराचं पाणी शिरलंय. मुकेश गटकळ यांच्या घरात पाणी शिरलंय...त्यामुळे घरातील साहित्याचं प्रचंड नुकसान झालंय. संसार उघड्यावर पडल्यामुळे महिलांच्या डोळ्यात अश्रू आलेत.

मुकेश गटकळ यांच्या घरात पुराचे पाणी घुसल्याने सर्वत्र चिखल झालाय. त्यांच्या घरातील सामान पाण्यामुळे अन् चिखलामुळे अस्ताव्यस्त अवस्थेत पडल्याचे कॅमेऱ्यात दिसतेय. मुलांच्या वह्या-पुस्तकेही पाण्यात भिजली आहेत. सगळ्या घरात चिखलाचा खच साचलाय, त्यामुळे काय खायचं असा प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिलाय. मायबाप सरकारनेच आता आम्हाला मदत करावी, असं आवाहन गटकळ कुटुंबियांनी केलं आहे. घरातील परिस्थिती सांगताना मिसेस गटकळ यांच्या अश्रूचा बांध फुटला...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

२, ३ की ४? घर बांधताना किती मजल्यांना मिळते परवानगी? जाणून घ्या काय आहेत बिल्डिंग बायलॉज नियम

Heart Failure ची सुरुवात कशी होते? छातीत दुखणं हे लक्षण नाही, डॉक्टरांनी सांगितली 7 संकेत

Maharashtra News Live Update: शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक

Marathi Actor : "सण साजरे करा, पण..."; DJ बंदीवर मराठमोळा अभिनेता स्पष्टच बोलला

Political News : विरोधक एकवटले, विजय थलपती यांचे सरकार कोसळणार? राजकीय क्षेत्रात हालचालींना वेग

SCROLL FOR NEXT