Jitendra Awhad And Gopichand Padalkar:  Saam Tv
Video

Monsoon Session: विधानभवनातील हाणामारीचा दुसरा VIDEO, पहिला हात कुणी उचलला?

Jitendra Awhad And Gopichand Padalkar: विधीमंडळाच्या लॉबीमध्ये आज जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना मारहाण केली. याचा दुसरा व्हिडीओ समोर आला आहे.

Priya More

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज काळिमा फासणारी घटना घडली. विधिमंडळाच्या लॉबीमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते भिडले. या घटनेचा दुसरा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते कसे एकमेकांना मारत आहेत हे दिसत आहे. या व्हिडीओतून पहिला हात कुणाच्या कार्यकर्त्यांनी उचलला हे देखील दिसत आहे. जितेंद्र आव्हाड यांनी गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी पहिला हात उचलला असल्याचे सांगितले. तर गोपीचंद पडळकर यांनी नेमकं काय झालं माहिती नाही असे सांगून तिथून निघून गेले.

गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड हे काल विधानभवनाच्या गेटवर आमने सामने आले होते. त्यांनी एकमेकांना शिवीगाळ केला होता. याचा व्हिडीओ देखील समोर आला होता. या वादाचे पडसाद आज पुन्हा विधीमंडळाच्या लॉबीमध्ये पाहायला मिळाले. या दोन्ही नेत्यांचे कार्यकर्त्यांनी एकमेकांना मारहाण केली. यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. नेमकं काय घडलं याचा अहवाल मागितला आहे. अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT