MNS news  saam tv
Video

MNS Protest: मनसेचं अनोखं आंदोलन, साकीनाक्यात नाल्यात उतरून व्हॉलिबॉल खेळले, VIDEO

Mumbai News: मुंबई येथील साकीनाका येथे मनसे पक्षाने थेट नाल्यामध्ये उतरून आंदोलन करत महापालिका प्रशासनाच्या कामाची पोलखोल केली आहे.

Omkar Sonawane

मयूर राणे, साम टीव्ही

मुंबईमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल केली आहे. दरवर्षी कोट्यवधी रुपये हे पालिका प्रशासनाला मिळत असतात. मात्र, तरीदेखील दरवर्षी ही परिस्थिति जैसे थे असते. यामुळे अनेक साथीचे रोग होऊ शकता. तरी देखील पालिका प्रशासन हे झोपा काढत असल्याचे चित्र आहे.

या नाले सफाईच्या विरोधात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने साकीनाक्यातील नाल्यात उतरून फुटबॉल फेकाफेकी करीत अनोखे आंदोलन केले. साकीनाक्यातील सत्यनगर येथील नाल्यात इतक्या मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे की त्यात मनसेचे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली आणि इतर पदाधिकारी उतरले आणि त्यांनी या नाल्यात फुटबॉल हातात घेऊन बॉल फेकाफेकी चा खेळ खेळला. पालिका प्रशासन, कंत्राटदार आणि लोकप्रतिनिधी ज्या पद्धतीने नालेसफाई बाबत जबाबदारीची एकमेकांकडे फेकाफेकी करीत जबाबदारी झटकत आहे, त्याचे प्रतीक म्हणून अश्या कचऱ्याने भरलेल्या नाल्यात बॉल फेकाफेकी करीत त्यांना जाग आणण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि तरी जाग नाही आली तर हाच कचरा पालिकेच्या कार्यालयात नेवून टाकू असा इशारा मनसेचे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray and Uddhav Thackeray: बाळासाहेबांच्या फोटोसमोर दोन्ही भावांची भेट; राज-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे चर्चा

Chanting mantras Brahma Muhurta: ब्रह्म मुहूर्तावर करा 'या' मंत्रांचा जप; नशीब क्षणार्धात बदलेल

Dnyanada Ramtirthkar: ज्ञानदा रामतीर्थकरचा प्रमोशन लूक, व्हाईट ड्रेसमध्ये दिल्या स्टायलिश पोज

Shahapur : अतिवृष्टीमुळे शेतातील बेडाघर कोसळले; झोपलेल्या शेतकऱ्याचा दबून मृत्यू

Shivneri To Vasai Fort: शिवनेरी किल्ल्यापासून वसई किल्ल्यापर्यंत कसे पोहोचाल? जाणून घ्या सर्व पर्याय

SCROLL FOR NEXT