Raj Thackeray responds strongly to media speculation on alliance with Uddhav Thackeray, calls it a distortion of facts. Saam TV News Marathi
Video

Raj Thackeray : युतीबाबतच्या बातमीनंतर राज ठाकरे संतापले! काय म्हणाले?

MNS chief Raj Thackeray criticized media : राज ठाकरे यांनी युतीच्या अफवांवर संताप व्यक्त केला आहे. माध्यमांनी माझ्या अनौपचारिक गप्पांचा विपर्यास केल्याचं म्हणत त्यांनी पोस्टद्वारे स्पष्टवक्तेपणाने भूमिका मांडली आहे. सोशल मीडियावरील धिंगाण्यावरही त्यांनी टीका केली आहे.

Namdeo Kumbhar

Raj Thackeray reacts to rumors of alliance with Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंसोबत युतीबाबतच्या बातम्यांवरुन राज ठाकरे चांगलेच संतापलेत. राजकीय विधान करायचं असेल तर अधिकृत पत्रकार परिषद घेईन असं राज ठाकरेंनी म्हटलंय. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असंही ते म्हणालेत...'सोशल मीडियावरचा धिंगाणा पत्रकारितेत येऊ नये असं ते म्हणालेत. यासंदर्भात राज ठाकरेंनी एक पोस्ट केली आहे.

१४ आणि १५ जुलै २०२५ ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवडक पदाधिकाऱ्यांसाठी इगतपुरी येथे शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. त्या शिबिराच्या दरम्यान माझा पत्रकारांशी अनौपचारिक संवाद झाला. त्या दरम्यान मला ५ जुलैच्या विजयी मेळाव्याबद्दल विचारण्यात आलं. त्यावर मी तो मेळावा राजकीय नव्हता तर तो मराठी माणसाच्या विजयाचा मेळावा होता. त्यावर मग युतीचं काय? असं विचारण्यात आलं, त्यावर मी त्यांना युतीच्या चर्चा तुमच्याशी करायच्या का आता? असं उत्तर दिलं.

त्यानंतर काल काही इंग्रजी आणि मराठी वर्तमानपत्रानी आणि निवडक माध्यमांनी, मी न बोललेले शब्द माझ्या तोंडात घातले की युतीचा निर्णय महापालिका निवडणुकांच्या आधीची परिस्थिती बघून घेतला जाईल. ही कुठली नवीन पत्रकारिता जन्माला आली आहे? अनौपचारिक गप्पा या अनौपचारिक ठेवायच्या असतात, आणि त्यातलं काही प्रसिद्ध केलंच तर जे बोललं नाही ते समोरच्याच्या तोंडात घालायचं नसतं हे भान पण आता गेलं आहे का? कोणाच्यातरी आहारी जाऊन किंवा सांगण्यावरून पत्रकारिता करायची हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडला आहे, हे आमच्या लक्षात येत नाहीये असं समजू नका. तुम्हाला काहीतरी रोज बातम्या हव्यात किंवा कोणाला तरी काही बातम्या हव्यात म्हणून आम्ही काय सतत बोलत राहावं का? आणि आज काही नाही मिळालं तर तयार करा बातम्या, हा कोणता प्रकार आहे पत्रकारितेचा? सोशल मिडीयावर ज्याप्रकारचा धिंगाणा चालू आहे तो प्रकार पत्रकारितेत येऊ नये हीच अपेक्षा!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धनगर नेते दिपक बोऱ्हाडे यांच्या आमरण उपोषणाचा सहावा दिवस

टीम इंडियाच्या जर्सीचा रंग कधीच का बदलला जात नाही? कारण तुम्हाला करेल आश्चर्यचकित

Heavy Rain : ढगफुटी सदृश्य पावसाने होत्याचे नव्हते केले; शेताला तलावाचे स्वरूप, दोन एकर सोयाबीनची गंज पाण्याखाली

सुनेला अंधार खोलीत डांबून ठेवलं, नंतर साप सोडला; महिला ओरडत राहिली पण.. सासरच्यांकडून छळ

Sayali Sanjeev: नाकात नथनी कानात झुमका केसामधी गजरा; मराठमोळी नेसून साडी भारी तुझा नखरा...

SCROLL FOR NEXT