MLA Santosh Bangar at the Hingoli polling booth moments before the alleged poll code violation incident went viral. Saam Tv
Video

Santosh Bangar: मतदानाच्या दिवशी आयोगाची मोठी कारवाई; शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल|VIDEO

Controversy in Hingoli: हिंगोलीतील मतदानादरम्यान शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी महिला मतदाराला ईव्हीएमवर बटन दाबायला सांगितल्याचा आरोप झाला असून हा प्रकार व्हायरल झाल्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Omkar Sonawane

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी आज मतदान पार पडत असताना हिंगोलीतील कळमुनरी येथे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर मोठ्या वादात सापडले आहेत. मतदान केंद्रातच मतदानाच्या गोपनीयतेचा भंग आणि आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर झाला असून या संपूर्ण प्रकारचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संतोष बांगरांना कडक शब्दात सुनावले आहे. या सर्व प्रकरणाची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हिंगोली येथील मंगळवारी बाजार परिसरातील मतदान केंद्र क्रमांक ३ येथे सकाळी संतोष बांगर मतदानासाठी गेले असता. तेव्हा त्यांनी महिला मतदाराला ईव्हीएमवर बटन दाबण्याबाबत सांगितले. तसेच मतदान केंद्रात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो आणि एकनाथ शिंदे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं अशी घोषणाबाजी केली. मोबाइल फोनचा देखील वापर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत १४ लाख बोगस मतदार? आदित्य ठाकरेंचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप|VIDEO

Maharashtra Nagar Parishad Live : नागपुरात लग्नसोहळा पार पडताच नवरीने केले मतदान

Maharashtra Live News Update: लोकसभेत 8 डिसेंबर रोजी वंदे मातरमच्या 150 व्या वर्षावर आणि 9 डिसेंबर रोजी निवडणूक सुधारणांवर चर्चा होणार

क्रीडा विश्वाला मोठा धक्का; माजी दिग्गज क्रिकेटपटूने घेतला जगाचा निरोप

Local Body Election : महाडनंतर रोह्यात वाद उफाळला; भाजप कार्यकर्त्याला मारहाण, VIDEO

SCROLL FOR NEXT