Narhari Zirval News Update SaamTv
Video

Narhari Zirval : झिरवळांच्या मानेला झटका, बीपी वाढला; डॉक्टरांकडून उपचार

MLA's Jump Of From Mantralaya : आरक्षणाच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेत मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून आदिवासी आमदारांनी उड्या मारल्या आहेत. त्यानंतर आता आमदार नरहरी झिरवळ यांची तब्बेत खालावली असल्याने डॉक्टरांची टीम बोलावण्यात आली आहे.

Saam Tv

नरहरी झिरवळ गत काही दिवसांपासून आदिवासी समाजाच्या न्याय हक्कांसाठी आक्रमकपणे आंदोलन करत आहेत. या प्रकरणी दोनवेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेटही घेतली होती. अनुसूचित जमातीच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागू नये. याशिवाय आदिवासींची पेसा कायद्यांतर्गत भरती करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी शुक्रवारी मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांना वेळ दिला नाही. सतत मुख्यमंत्र्यांकडून अशा प्रकारे टोलवाटोलवी केली जात असल्याने झिरवळ यांनी आक्रमक पवित्र घेत मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली आहे. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.

नरहरी झिरवळ यांच्यासह हिरामण खोसकर यांनीही उडी मारली. त्यानंतर त्यांनी आदिवासी समाजाच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. या अनपेक्षितपणे घडलेल्या प्रकारामुळे मंत्रालयात एकच हल्लकल्लोळ माजला. त्यानंतर पोलिसांनी झिरवळ व त्यांच्या सहकाऱ्यांना जाळीवरून सुरक्षित बाहेर काढले. मात्र या सर्व गदारोळात झिरवळ यांच्या मानेला दुखापत झाल्याचेही सांगण्यात येत आहे. तसच त्यांचा बीपी देखील वाढला आहे. त्यांच्यासाठी डॉक्टरांची तुकडी मंत्रालयात दाखल झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT