Aditya Thackarey News SaamTv
Video

VIDEO : क्षणभर विश्रांती! आदित्य ठाकरेंनी प्रचारादरम्यान लुटला गल्ली क्रिकेटचा आनंद

Aditya Thackarey News : आदित्य ठाकरे सध्या प्रचारासाठी वरळी विधानसभा मतदारसंघात फिरत आहेत. यावेळी त्यांनी परिसरातील लहान मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.

Saam Tv

ठाकरे गटाचे वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला असून वरळीच्या गल्लीबोळात आदित्य ठाकरे प्रचार करत आहेत. शनिवारी प्रचारफेरी करताना लहान मुलांना क्रिकेट खेळताना बघून आदित्य ठाकरे यांना क्रिकेट खेळण्याचा मोह आवरला नाही. यावेळी त्यांनी या चिमुकल्यांसोबत क्रिकेटचा आनंद लुटला.

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्यात सर्व उमेदवारांकडून प्रचारसभा आणि प्रचारफेऱ्यांचा धडाका सुरू आहे. या निवडणुकीच्या मैदानात यंदा आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र, या प्रचाराच्या धामधुमीत काहीसा विरंगुळा म्हणून आदित्य ठाकरे हे खेळामध्ये रमलेले पाहायला मिळालेत. वरळी विधानसभा परिसरात प्रचार करत असताना आदित्य ठाकरे यांनी परिसरातील लहान मुलांसोबत क्रिकेटचा आनंद लुटला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, यावेळी आदित्य ठाकरे यांनी षटकार मारल्यानंतर सर्वांनी एकच जल्लोष केलेला या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dates Side Effects : जास्त खजूर खाणे टाळा! जाणून घ्या शरीरावर होणारे दुष्परिणाम

Soft Dosa Tips: डोसा गोल होत नाही? तव्याला चिकटतो? मग या टिप्स वापरा, सॉफ्ट अन् झटपट होईल डोसा

Maharashtra Live News Update : पारा घसरला, मुंबई-पुण्यासह राज्यात थंडीची लाट

Shani Dev Uday: 30 वर्षांनंतर शनीदेवाचा होणार उदय; 'या' राशींना लॉटरी लागून पदरात पडणार पुण्य

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! आठव्या वेतन आयोगाबाबत ७ नवीन अपडेट समोर

SCROLL FOR NEXT