Nitesh Rane SaamTv
Video

Nitesh Rane : मच्छर मारायला रेकी करण्याची गरज नाही, नितेश राणेंचा राऊतांना टोला|VIDEO

Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांच्या घराची रेकी केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यांनंतर आदित्य ठाकरे यांनी राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली होती. त्यावर आता नितेश राणे यांनी टीका केली आहे.

Saam Tv

मच्छर मारायला गुडनाइटचे कॉईल लावावे लागतात. त्यासाठी रेकी करण्याची गरज नाही, असा टोला मंत्री नितेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांना लगावला आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या मुंबई येथील निवासस्थानाची रेकी दोन तरुण करत असल्याचा एक व्हिडिओ शुक्रवारी समोर आला आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याच संदर्भात आज नितेश राणे यांनी राऊतांना टोला लगावला आहे.

नितेश राणे म्हणाले की, 'संजय राऊत यांच्या घराची कुणीतरी रेकी केली आहे. मला पहिल्यांदा अनुभव आहे की, मच्छर मारण्यासाठीसुद्धा रेकी करावी लागते. मच्छर मारहण्यासाठी कॉइल लावा. त्याला रेकी करण्याची गरज नाही. कदाचित खिचडीचोर कुठे राहतो, हे पाहण्यासाठी कुणीतरी दुचाकीवरून आले असेल. त्यामुळे गांभीर्यानं घेण्याची गोष्ट नाही', असा खोचक टोला राणे यांनी लगावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुणे हादरले! दिराकडून भावजयीवर जीवघेणा हल्ला, कोयत्याने सपासप वार

Pre Primary School: नोंदणी अनिवार्य ! पूर्व प्राथमिक शाळांसाठी सरकार आणणार नवा कायदा

केरळमध्ये कमळ फुलवण्यासाठी भाजप लागली कामाला ;महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यावर सोपवली मोठी जबाबदारी

Beed Crime: जमीन-ट्रॅक्टरसाठी नातं विसरला; जन्मदात्यासह बहीण आणि मेहुण्याला लोखंडी पाईपनं बेदम मारहाण

Rahuri By-Election: पवारांच्या नेत्याकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक, राहुरी पोटनिवडणुकीवरून राजकारण तापलं?

SCROLL FOR NEXT