Hasan Mushrif SaamTv
Video

Hasan Mushrif : 'मी पवारांना गुरुदक्षिणा दिली, पण ..' ; हसन मुश्रीफांचं मोठं विधान

Samarjeetsing Ghatge : शरदचंद्र पवार पक्षाचे नेते समरजितसिंह घाटगे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली होती. त्यावर मुश्रीफांनी घाटगे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Saam Tv

मंत्री हसन मुश्रीफ यांनी समरजित घाटगे यांच्यावर निशाणा साधला आहे. ''मी पवारांना गुरुदक्षिणा दिली, मात्र त्यांनी फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसलं. या प्रवृत्तीमुळेच मला पवारांना सोडण्याची वेळ आली.'' असं म्हणत मुश्रीफांनी घाटगे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी 'त्यांना' मुलासारखे प्रेम दिले. खासदार सुप्रिया सुळे या मोठे भाऊ मानून 'त्यांना' राखी बांधायच्या. ईडीपासून सुटका आणि आयुष्यभर न मिळालेल्या पालकमंत्री पदासाठी 'त्यांनी' या विश्वासाचा सौदा केला. त्यामुळे 'त्यांना' आता झोप येत नाही. यातून वैफल्यग्रस्त झाल्याने त्यांच्याकडून चुकीची वक्तव्ये येत आहेत. अशी टीका शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर नाव न घेता केली होती. त्यावर आता हसन मुश्रीफ यांनी देखील समरजितसिंह घाटगे यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. मी पवारांना गुरुदक्षिणा दिली, मात्र त्यांनी फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसलं. या प्रवृत्तीमुळेच मला पवारांना सोडण्याची वेळ आली, असं मुश्रीफ यांनी म्हंटल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Spruha Joshi: गळ्यात हार, कपाळी चंद्रकोर; दिवाळीनिमित्त सजली अभिनेत्री स्पृहा

Maharashtra Live News Update : अमरावतीत नऊ महिन्यात 18 हजार नागरिकांना मोकाट कुत्र्यांचा चावा

भाजप प्रवेश लटकला अन् सावंताचे मन बदललं, सोलापूरचं राजकारण ३६० डिग्री बदलणार

Manoj Jarange: मनोज जरांगे नावाचा माणूस बिनडोक, राज्यात विष पेरण्याचे काम केले; या नेत्याचा गंभीर आरोप|VIDEO

Sonalee Kulkarni Photos: पारंपारिक साडी अन् सौंदर्य, सोनाली कुलकर्णीचं दिवाळी स्पेशल फोटोशूट

SCROLL FOR NEXT